गोष्ट माझ्या आईची भाग ४९
*📝गोष्ट माझ्या आईची* *📝 .*सुनीता देशपांडे* 📔 *भाग - 49* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *माझ्या आईचे नाव होते सरला,तर वडील सदानंद ठाकूर.एखादे व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळे असते.त्यात काहीतरी वेगळे असते.अशी माझी आई मला नेहमी इतरांपेक्षा वेगळी वाटायची, आणि तितकीच आवडायचीही*. *माझा जन्म जसा रत्नागिरीत झाला तसे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले.पुढील शिक्षण मुंबई बालमोहन विद्यामंदिर येथे झाले.मग मला परत रत्नागिरीला येण्याची संधी मिळाली.येथे पटवर्धन प्रशालेत माझे मॅट्रिक चे शिक्षण झाले.उच्च शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज येथे पूर्ण केले.हे सगळे शिक्षण आई बाबा मागे ठामपणे उभे राहिले म्हणून झाले*. *मी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला,वर्तमान पत्र काढले हे सगळे ऐन ता...