गोष्ट माझ्या आईची भाग ३०
*📝गोष्ट माझ्या आईची* *📝 राकेश शर्मा भारतीय अंतराळवीर .* 📔 *भाग - 30* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *माझी आई मला सांगायची या जगात परमेश्वर ही एक महान शक्ती आहे.त्याची प्रार्थना करावी,त्यात मोठे सामर्थ्य असते.जेव्हा काही गोष्टी आपण बुद्धीच्या जोरावर करताना निराश होतो तेव्हा हिच श्रद्धा तुम्हाला निश्चित यशापर्यंत घेऊन जाते.माझे स्वप्न होते की मी एन. डी. ए मध्ये प्रवेश घ्यावा त्या दृष्टीने मी पर्यंत केले आणि मी यशस्वी झालो.भारतीय हवाई दलात जेव्हा मी दाखल झालो तो माझ्या जीवनातील आनंदी दिवस होता.या यशात आईचे संस्कार होते*. *लहानपणी जी विमाने डोळे विस्पारून मी पहात असे ती विमाने मी सहज चालवू लागलो होतो."आयुष्यात जे करिअर म्हणून निवडशील ते पोटासाठी निवडू नकोस तर त्यात सर्वोच्च स्थान मिळवण्याच...