गोष्ट माझ्या आईची भाग २७
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 खाशाबा जाधव ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल.*
📔 *भाग - 27*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर हे माझे गाव होते.माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.माझ्यासह आठ भावंडे,आई वडील असे दहा जणांचे आमचे कुटुंब होते*.
*माझी आई अजिबात शिकलेली नव्हती पण आपल्या मुलांनी शिकून खूप मोठे झाले पाहिजे असे तिला नेहमी वाटतं असे."मी शिकले नाही तुम्ही शिका मोठे व्हा.पुढच्या काळात शिक्षण हेच आपला आधार असणार आहे.देवाची पूजा करा पण देव मात्र माणसात पहावा. हिच माणसे कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी पडतील"अशी ती म्हणायची*.
*शालेय जीवनात माझी कुस्ती बहरली ती प्रा.माणिकराव सर,प्राचार्य शरद खर्डेकर यांच्यामुळे.हे पितृतुल्य शिक्षक भेटले म्हणूनच मी तालमीत घाम गाळून उत्तम मल्ल झालो. कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींनी मदत केली म्हणून मी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालो.येथे माझा सहावा क्रमांक आला.पण याची कसर मी हेलशिंकीला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कुस्तीतले पाहिले कास्य पदक मिळवून देवून भरून काढली*.
*"आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात,अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतं असतात परंतू त्याची पर्वा न करता पुढे जात रहावे,हे सगळे करत असताना अन्याय सहन करू नये"अशी आई नेहमी म्हणत असे.मी इतका मोठा मल्ल झालो.यात माझ्या आईचे योगदान मोठे होते कारण स्वतःला अक्षर ओळख नसणाऱ्या माझ्या आईने आम्हाला मात्र अक्षरांनी साक्षर केले आणि जगण्याच्या लायक बनवले*.
*आई शिक्षित असो वा न शिकलेली तिच्या हृदयात मुलांसाठी झरणाऱ्या प्रेमाच्या कारुण्यशलाका एकच असतात.आईचे प्रेम मोजणारे कोणतेही यंत्र या जगाच्या पाठीवर आजपर्यंत तयार झाले नाही आणि होणारही नाही यामुळेच आई महान ठरते*.
Comments
Post a Comment