गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग-२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-2* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे* 8308677799 8806150248 *तो सहा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.मग पोटासाठी एक मुलगा अतिशय गरीब परिस्थितीत गोवा येथून आई बरोबर मायानगरी मुंबईला येतो.गिरगावात चाळीत राहतो. मुंबई च्या पालिकेच्या शाळेत शिकतो .आयुष्यातील कमीत कमी 12 वर्षे अनवाणी चालतो.सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करतो .घर चालवण्यासाठी आईचे शिवणकाम ,इतर पडेल ते काम करणे पहातो, हे सगळे पाहून मनात खुप मोठे होण्याचा वणवा पेटतो. पुढे तो इतका मोठा होतो की पदमश्री, पदमभूषण,पदमविभूषण या भारतातील अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी तो सन्मानित होतो.तो मुलगा म्हणजेच भारताचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात जगाच्या नकाशावर नेणारे महान शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर* माशेल या छोट्या गावातून येत परिस्थितीशी दोन हात करत ते शिकत राहिले.अकरावी बोर्ड परीक्षेत मेरिट मध्ये आले .शिक्षण अर्धवट रहाते असे वाटत असताना यावेळी टाटा ट्रस्ट ची स्कॉलरशिप मदतीला धावून आली पुढे ब...