औषधी वनस्पती भाग - २ कडुलिंब
🌳 *औषधी वनस्पती भाग-२*🌳 *कडुलिंब* *इंग्रजी नाव - Neem* *शास्त्रीय नाव- Azadiracha Indica* कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. कडुलिंबाच्या काड्यांचा उपयोग दात साफ करण्यासाठी केला जातो. कडुलिंबाच्या पानापासून खोडापर्यत प्रत्येक भाग उपयोगी आहे. कडुलिंबामध्ये अँटीबँक्टेरीयल आणि अँटीव्हायरल गुण असण्यासोबत अँटी ऑक्सिडेंटही मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होते त्याप्रमाणे अल्सर आणि इतर जठासंबंधी समस्या दूर होतात. कडुलिंब आपल्या शरीरातील विषारी आणि हानिकारक जीवाणू बाहेर टाकू शकते. कडुलिंबाचे सेवन निरोगी पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र जास्त प्रमाणात कडुलिंबाचे सेवन करू नये वर्षातून २१ दिवसच त्याचे सेवन करावे. चेहऱ्यावर नियमित कडुलिंबाचा लेप किंवा तेल लावल्यास चेहरा तरूण दिसतो व चेहरा टवटवीत होताे. कडुलिंबाच्या पानांचा रस मधुमेहावर प्रभावी उपचार म...