औषधी वनस्पती भाग १ - तुळस
☘️ *औषधी वनस्पती भाग १*🍀
🌱🌱 *तुळस*🌱🌱
*इंग्रजी नाव - White Basil*
*शास्त्रीय नाव - Ocimum tenuiflorum*
हिंदू धर्मात तुळशीला मानाचे स्थान आहे. तुळशीच्या 'बी' ला मंजिरी म्हटले जाते. तुळशीचे दोन प्रकार आहे.
हिरवी (राम ) तुळस व काळी(कृष्ण) तुळस . तुळस ही भगवान विष्णूला व पांडुरंगाला फार प्रिय आहे. अनेक रोग बरे करण्यास व शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशी खूप उपयोगी आहे. खोकला व सर्दी झाल्यास तुळस, आले, मिरी, लवंग यांचा काढा घेतल्यास आराम मिळतो. अपचन, त्वचारोग यावर तुळशीची पाने उपयोगी पडतात. सकाळी तुळशीच्या पानांचा रस सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. तुळशीच्या पानांचा रस पित्तशामक म्हणून वापरला जातो, तसेच तुळशीच्या बिया मूत्रविकारात उपयुक्त ठरतात
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुळशीच्या पानांचा लेप उपयोगी उपयोगी ठरतो.
तुळस हवा शुद्ध करण्याचे काम करते. तुळशीच्या काड्या थोड्या पोकळ असतात. त्यापासून मणी तयार केले जातात. त्यांची माळ जप करण्यासाठी वापरतात. तुळशीची रोपटी भरपूर लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होणार नाही.


Comments
Post a Comment