गोष्टी -जिद्दी माणसांच्या भाग ५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-5* *📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे* 8308677799 8806150248 *केरळ राज्यातील कोझिकोड येथील पय्योली या छोट्या खेड्यात वडील पाइथल आई लक्ष्मी यांच्या पोटी ती जन्माला आली.घरची परिस्थिती गरिबीचीच.इतक्या लहानपणी तिची काटक शरीर यष्टी ,चपळता,धावण्याची पद्धत सारे काही डोळ्याचे पारणे फेडणारे होती*. *ती शाळेत चौथीत असताना तीचे बालपणीचे गुरू बाळकृष्णन यांनी तिला* *जिल्हास्तरावरील स्पर्धकाबरोबर धावायला लावले, ती धावली आणि काय आश्चर्य ती जिंकली सुद्धा.वयाच्या 13 व्या वर्षी तिने धावण्याचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.मग तीने मागे वळून पाहिले नाही .पुढे ती देशासाठी धावत राहिली ,ती इतकी धावली की आंतरराष्ट्रीय पदकांचे शतक करणारी एकमेव भारतीय धावपटू ठरली .ती महान खेळाडू म्हणजे भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा.यावेळी तिचे गुरू होते नंबियार सर. उडनपरी,पय्योली एक्सप्रेस, गोल्डन गर्ल , मैदानाची राणी ही सारी तिचीच नावे* पी.टी. उषा ने आपल्या सुवर्ण कारकिर्दीत1985 मध्ये जकार्ता येथे 6 पदके,1986 मध्ये दक्षिण कोरिया येथे 5पदके, अश...