गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३८
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2* *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* *📝भाग -138-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 त्याचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 मध्ये तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे झाला.त्याच्या आईचे नाव पार्वती,तर वडील चंद्रशेखर अय्यर हे प्राध्यापक होते. त्याने 11 आणि 13 वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बहुतेक शास्त्रात विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला.पदवीधर विद्यार्थी असताना 1906 साली त्याचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित झाला वयाच्या 19 व्या वर्षी इंडियन फायनान्स सर्विस मध्ये असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून तो नोकरीला लागला.येथे त्याची सर्वप्रथम आयएसएस म्हणजेच इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्सन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेची ओळख झाली.मग मात्र तो मुलगा थांबला नाही तेथे त्याने स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळवली.येथील संशोधनातूनच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून जात असताना त्याच्या तरंग लांबी किंवा रंगात बदल होतो हा ...