Posts

Showing posts from July, 2021

गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग -६

Image
 [9:40 PM, 7/31/2021] chand: गोष्टी-जिद्दी माणसांच्या* 📝 भाग-6* 📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     88061502 48 पुणे जिल्ह्यातील खडकी येथे एका तमिळ सामान्य कुटुंबात  त्याचा जन्म झाला.घरात त्याच्यासह पाच भाऊ होते.मैदानाची देखभाल करणारे वडील नागलिंगम व गृहिणी असणारी आई अंदालम्मा संसाराचा गाडा  रेटत होते . हा लहान असल्यापासून भाऊ आणि वडिलांबरोबर मैदानावर जायचा. तुटलेल्या लाकडी स्टिक आणि वापरलेले चेंडू घेऊन तासनतास  खेळायचा .त्याला हॉकी खेळाचा असा काही नाद लागला कि त्याने त्या खेळालाच आयुष्य बनवले. त्यात तो इतका पारंगत झाला की पुढे तो भारतीय हॉकी संघाचा आघाडीचा खेळाडू तर बनलाच शिवाय सुवर्णयुग असणाऱ्या  भारतीय हॉकी संघाचा कर्णधार ही झाला.  तो  महान खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले. धनराज हे एकमेव असे भारतीय खेळाडू आहे की त्यांनी चार  ऑलम्पिक,चार जागतिक हॉकी करंडक,चार चॅम्पियन चषक,चार आशियाई चषक, स्पर्धेत भाग घेतला आहे.ते कर्णधार असताना भारतीय हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक,आणि आशिया कप जिंकून भारतीयांना अभिमानाचे क्षण द...