Posts

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३८

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -138-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 त्याचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 मध्ये तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे झाला.त्याच्या आईचे नाव पार्वती,तर वडील चंद्रशेखर अय्यर हे प्राध्यापक होते. त्याने 11 आणि 13 वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बहुतेक शास्त्रात विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला.पदवीधर विद्यार्थी असताना 1906 साली त्याचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित झाला वयाच्या 19 व्या वर्षी इंडियन फायनान्स सर्विस मध्ये असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून तो नोकरीला लागला.येथे त्याची सर्वप्रथम आयएसएस म्हणजेच इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्सन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेची ओळख झाली.मग मात्र तो मुलगा थांबला नाही तेथे त्याने स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळवली.येथील संशोधनातूनच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून जात असताना त्याच्या तरंग लांबी किंवा रंगात बदल होतो हा ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३७

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -37-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्याचे बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेले त्याने शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप संघर्ष केला.परंतु शिक्षणाबद्दल असलेल्या समर्पणाने त्याने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली.त्याने आयआयटी मुंबईतून पुढे एमटेक केले आणि नंतर बेल्जियम मधील आय एम इ सी विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केले. पुढे तो मुलगा आयआयटी मुंबईमध्ये ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा प्राध्यापक होतो.सौर ऊर्जा क्षेत्रात मोठे योगदान देतो. लाखो रुपयाची नोकरी हाताशी असताना त्याच्या असे लक्षात येते की इंधनाचे पारंपारिक साठे नष्ट होत चालले आहेत शिवाय यामुळे येणारी प्रदूषणाची समस्या ही बिकट होणार आहे. या विचारातून तो मुलगा ग्रामीण भागातील मुलांना या बाबत शिक्षण आणि सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांवर काम करण्याचा संकल्प करतो.त्य...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 136

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -36-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *फ्रान्स देशातील ब्लॉइस येथे त्याचा जन्म 22 ऑगस्ट 1647 मध्ये झाला. त्याचे वडील डेनिस हे डॉक्टर होते. वडिलांच्या वैद्यकीय व्यवसायामुळे त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दलची प्रेरणा मिळते. यामुळेच त्याला शास्त्रीय विचारसरणी आणि प्रयोगशीलता यांची आवड लहान वयातच निर्माण होते आणि येथेच त्याच्या संशोधनाचा पाया घातला जातो. पुढे तो मुलगा गणित,भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा सखोल अभ्यास करतो.त्याला संशोधनाची आवड लागते.पुढे तो मुलगा संशोधन करत असताना त्याच्या असे लक्षात येते की स्टीमच्या म्हणजेच वाफेच्या दाबामुळे उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि पदार्थ अधिक लवकर शिजतो.यावरूनच त्याने तापमान आणि दबाव यामध्ये थेट संबंध असतो हा शोध लावला.हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक बंद भांडे तयार केले ज्यामध्ये पाणी तापवले असता वाफ निर्माण होऊन मोठा दाब तयार होतो.हा दाब पदार्थ जलद शिजण्यासाठी उपयुक्त ठरतो.पदार्थ ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 135

Image
  *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -35-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म जर्मनीमधील मिसेन सॅक्सनी येथे छोट्या गावात साधारण परिस्थिती असणाऱ्या घरात 10 एप्रिल 1755 रोजी झाला. त्याचे वडील ख्रिश्चन गॉटफ्रीड ऍनिमल हे एक चित्रकार आणि पोर्सलेन पॉटरीवर डिझाईन करणारे कामगार होते.लहान वयात स्वतःच्या तल्लक आणि तीव्र बुद्धिमत्तेमुळे तो शाळेत शिक्षकांचा लाडका होता.याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मुलगा ग्रीक,लॅटिन,इंग्रजी,फ्रेंच,इटालियन आणि अरेबिक भाषांवर प्रभुत्व मिळवतो.जोहान्न मुल्लर नावाचे शिक्षक त्याच्या जीवनात देवदूत बनून येतात.त्याची हुशारी ओळखून त्याला शिक्षणात प्रचंड मदत करतात. किशोर वयात स्वतःच्या  शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो मुलगा पुस्तकांचे अनुवाद करण्याचे काम करतो. पुढे तो मुलगा इतक्या कठीण परिस्थितीतही लीपझिंग आणि व्हिएन्ना या विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे शिक्षण पूर्ण करतो. 1779 मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी मिळवतो.पुढे तो मुलगा पार...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -134-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म कर्नाटक राज्यातील  गोरुर हसन येथे कन्नड कुटुंबात एका छोट्या गावात 13 नोव्हेंबर 19 51 रोजी झाला. त्याचे वडील शाळेत शिक्षक तसेच उत्तम कादंबरीकारही होते. त्याचे बालपण गावातील नैसर्गिक वातावरणात गेले जेथे शेतमजुरी व शेतातील कामांमध्येही त्याचा सहभाग असायचा.इयत्ता पाचवीत असताना त्याला सैनिकी शाळेला प्रवेश मिळतो आणि त्याचे नशीब उघडते.पुढे तो मुलगा नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे निवडला जातो. पुढे तो मुलगा भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून दाखल होतो.सैन्य दलात सेवा करून हा मुलगा वयाच्या 28 व्या वर्षी सैन्य दलातून निवृत्त होतो. काही काळ पोल्ट्री,शेती,हॉटेल स्टॉक असे व्यवसाय करतो. हे सगळे करत असताना त्याच्या डोक्यात एक अफलातून कल्पना येते ती कल्पना म्हणजे सामान्य माणसाला सर्वात स्वस्त दरात विमान प्रवास करता यावा म्हणून स्वतःची विमान कंपनी काढण्याची कल्पना. सुरुवातीला ही कल्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 33

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -33-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249. *त्याचा जन्म 11 जानेवारी 1954 रोजी विदिशा मध्य प्रदेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.घरात चांगले वातावरण असल्यामुळे त्याला शिक्षणाचे महत्त्व समजले.त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे तो मुलगा इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी मिळवतो.त्यानंतर मास्टर ऑफ इंजीनियरिंग सुद्धा पूर्ण करतो.शिक्षणाच्या काळात सामाजिक अन्याय आणि बालकांवरील होणाऱ्या अत्याचाराची त्याला जाणीव होते.मग तो मुलगा उच्च शिक्षित असूनही 1980 च्या दशकात बालकामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू करतो.तो मुलगा साऱ्या जगाला हे पटवून देतो की अनेक मुलं त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत आणि लहानपणातच त्यांना श्रम करायला लागतात यामध्ये समाजात असमानता  येत आहे.तो मुलगा मुलांच्या शारीरिक रक्षणासाठी बचपन बचाव आंदोलन सुरू करतो ज्याद्वारे 144 देशातील 80 हजार पेक्षा बाल कामगारांना बाल मजुरीतून मुक्त करतो.त्यांचे पुनर्व...

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

Image
 *पुणे जिल्ह्यातील धानोरे शाळेचा राज्यात डंका*  *राज्यातील प्रथम क्रमांकाची स्वच्छ सुंदर शाळा म्हणून सन्मान*  *अखंड महाराष्ट्राचा ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊलींची जिथे समाधी आहे त्या तीर्थक्षेत्र आळंदीपासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही पूर्वेला गेले की एक टुमदार गाव लागते. त्या गावाचे नाव धानोरे. या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळी ओळख देणारी त्या गावातील आदर्श  जिल्हा परिषद शाळा आज सर्व महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात केंद्रस्थानी आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे.या आदर्श शाळेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाबरोबर धानोरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक सण 2024- 25 मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यमापन  केले. या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विविध उपक्रमा संदर्भात गुणांकन देण्यात आले होते. यात विद्यार्...