गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 33


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -33-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249.


*त्याचा जन्म 11 जानेवारी 1954 रोजी विदिशा मध्य प्रदेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.घरात चांगले वातावरण असल्यामुळे त्याला शिक्षणाचे महत्त्व समजले.त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे तो मुलगा इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी मिळवतो.त्यानंतर मास्टर ऑफ इंजीनियरिंग सुद्धा पूर्ण करतो.शिक्षणाच्या काळात सामाजिक अन्याय आणि बालकांवरील होणाऱ्या अत्याचाराची त्याला जाणीव होते.मग तो मुलगा उच्च शिक्षित असूनही 1980 च्या दशकात बालकामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू करतो.तो मुलगा साऱ्या जगाला हे पटवून देतो की अनेक मुलं त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत आणि लहानपणातच त्यांना श्रम करायला लागतात यामध्ये समाजात असमानता  येत आहे.तो मुलगा मुलांच्या शारीरिक रक्षणासाठी बचपन बचाव आंदोलन सुरू करतो ज्याद्वारे 144 देशातील 80 हजार पेक्षा बाल कामगारांना बाल मजुरीतून मुक्त करतो.त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी लढा देतो. Lत्याची बालकामगारांच्या विरोधातील चळवळ जागतिक स्तरावर पोहोचते साऱ्या जगाला याची दखल घ्यावी लागते.वंचित मुलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणारा तो मुलगा म्हणजे बाल कामगारांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर लढा देऊन नोबेल पुरस्कार मिळवणारे महान व्यक्तीमहत्त्व कैलास सत्यार्थी.* 


*कैलास सत्यार्थी यांनी बालकामगारांच्या हक्कासाठी केलेल्या अविस्मरणीय कामाबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार,ग्लोबल गोलकीपर पुरस्कार,प्लॅनेटरी चेंज मेकर पुरस्कार, इंटरनॅशनल चिल्ड्रन प्राईज रॉबर्ट्स ॲप कॅनडी ह्यूमन राइट्स अवॉर्ड यासारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले.बालकांच्या अधिकारासाठी लढणारे साधी राहणी असणारे कैलास सत्यार्थी त्यांच्या कार्यामुळे आणि दृढ इच्छाशक्तीमुळे प्रसिद्ध आहेत.त्यांच्या याच गुणांमध्ये जगभरातील अनेक बालकांचे जीवन त्यांनी बदलले.त्यांच्या या कार्यामुळे हजारो बालकांना एक नवीन जीवन मिळाले.आकडेवारी नुसार जगभरात दर सहा मिनिटाला एक बालक गायब होते.मुलांच्या तस्करीवरही त्यांनी जगभरात आपल्या भाषणातून मोठी जागृती केली.*


 *सत्यार्थी यांनी बचपन बचाव आंदोलनाच्या माध्यमातून लाखो बाल कामगारांना मुक्त केले आणि त्यांच्या हक्कासाठी जागरूकता वाढवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना इतर देशातील बालकांच्या परिस्थितीचे निरीक्षण करताना त्यांनी आपल्या कार्याचा जागतिक दृष्टिकोन निर्माण केला.बाल कामगार असणाऱ्या मुलांचे दुःख वेदना डोळ्यातील अश्रू त्यांनी जवळून पाहिले म्हणून कैलास सत्यार्थी इतके उच्चशिक्षित असूनही अगदी वंचित घटकांसाठी इतके मोठे काम उभे करू शकले.आपल्या प्रचंड संघर्षाच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी एक जिद्दीचा नवा अध्याय आपल्या कार्याच्या जोरावर जगाला लिहायला भाग पाडले. दुसऱ्याचे अश्रू पुसायला प्रचंड हिम्मत आणि धैर्य लागते हे धैर्य कैलास सत्यार्थी यांनी लहान मुलांच्या बाबतीत दाखवले.लहान वयातच शोषणाला बळी पडलेल्या बालकामगारांना एक नवी उमेद त्यांनी दिली म्हणून कैलास सत्यार्थी खऱ्या अर्थाने या समाजाचे खरेखुरे हिरो ठरतात. त्यांच्या जीवनाकडे पाहताना आपण इतकेच म्हणायचे प्रत्येक वेदनेला सुखाचा किनारा असतो फक्त त्या किनाऱ्यावर कुणीतरी आधाराचा हात देणारा व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते आणि ती व्यक्ती आयुष्याचे सोने करून जाते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०