गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 31
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -31*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*📝*भाग-31*
*मुंबई मधील पारशी कुटूंबात त्याचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.घरात सगळी सुबत्ता होती. पण त्याच्या आई वडिलांचा संघर्ष वाढत गेला आणि तो दहा वर्षाचा असताना त्याची आई सोनू व वडिल नवल यांचा घटस्फोट झाला.नंतर आजी नवाजबाई यांनी त्याचा सांभाळ केला.तो मोठा झाल्यावर हॉवर्ड युनिव्हर्सिटी मधून त्याने मॅनेजमेंट डिग्री घेतली तो भारतात आला.त्यांच्या घराण्यातील नियमाप्रमाणे त्याला त्यांच्या व्यवसायातच कामगार म्हणूनच काम करावे लागले.पुढे त्याच्यावर त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी आली. स्वतःच्या मेहनतीने तो व्यवसाय त्याने इतक्या उंचीवर नेला की जगातील अनेक मोठे उद्योग त्या समूहाने खरेदी केले.तो समूह म्हणजे टाटा समूह, आणि टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा तो मुलगा म्हणजे रतन नवल टाटा*.
*1991 मध्ये रतन टाटा 'टाटा ग्रुप' चे चेअरमन बनले.प्रवाशी वाहने बनवताना त्यांनी कार क्षेत्रात1998 ला इंडिका कार बनवून पाऊल ठेवले.पण यात त्यांना अपयश आले.फोर्ड कंपनीला कार प्लॅन्ट विकायचे ठरले पण तेथे झालेला अपमान त्यांनी पचवला.ते परत उभे राहिले .कार व्यवसायात इतके यशस्वी झाले की त्याच फोर्ड कंपनीचे जग्वार,लँड रोअर हे नावाजलेले ब्रँड 2.3मिलियन डॉलर ला विकत घेतले.पुढे टाटा यांनी टी बॅग बनवणारी 'टेटली' ही जगातील सर्वात मोठी कंपनी विकत घेतली.त्यात Daewoo,लंडनचा corus ग्रुप, यांची भर पडली.गरिबांची nano कार टाटांनीच आणली.OLA, Paytm, snapdeal, lenskart यात गुंतवणूक करून त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले*.
*सुई ,माचीस, ,मीठ,वाहने,वीज,यासारख्या 100 पेक्षा जास्त कंपन्या150 देशात ,उभ्या राहिल्या त्या रतन टाटा यांच्या कल्पक नेतृत्वाखाली.आज 7 लाख पेक्षा अधिक कामगार यात काम करतात.आपल्या नफ्यातील 66 टक्के वाटा समाजासाठी देणारा हा माणूस आपल्या कॅन्सर हॉस्पिटलमधून अनेकांचे दुःख दूर करत आहे.मुंबईतील ताज हॉटेल वरील हल्ल्यातील जखमी सर्व कर्मचाऱ्यांचा खर्च टाटा समूहाने केला होता.अब्जाधीश असणारे,अविवाहित असणारे रतन टाटा अतिशय साधे जीवन जगत आले आहे.संपत्तीचा गर्व ,उन्माद, त्यांच्या देहबोलीतून कधीही पहायला मिळत नाही*.
*पदमश्री,पदमविभूषण यासारखे मानाचे पुरस्कार मिळालेले रतन टाटा,प्रखर देशभक्त असणारे रतन टाटा यांचे आदर्शवत जीवन जणू आपल्याला हिच प्रेरणा देते की,तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुम्ही ज्यांच्यामुळे मोठे झाला त्यांना कधीही विसरू नका.संपत्ती येते नी जाते पण माणूस त्या काळात कसा वागला हेच त्याचे वागणे त्याला त्याच्या जाण्यानंतरही आयुष्यभर मोठे करते.मग हीच माणसे अनेक पिढ्यांसाठी आदर्श बनून राहतात.*

Comments
Post a Comment