गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-130


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -30-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगाल मधील मिराटि- किर्नहार येथे झाला.त्याच्या वडिलांचे नाव कामदा मुखर्जी, जे ब्रिटिश विरोधी लढ्यात सक्रिय होते यात त्यांना दहा वर्ष शिक्षा झाली होती.त्याच्या आईचे नाव राजलक्ष्मी होते.त्याला लहानपणापासूनच शिक्षणात खूप रस होता.त्याचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत होते नंतर तो मुलगा सुरी महाविद्यालयात शिक्षण घेतो. कोलकात्यातील कॉलेजमध्ये राज्यशास्त्र,इतिहास,कायद्याची पदवी घेतो.शिक्षण क्षेत्रात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम करतो.तेथे उत्कृष्ट कामगिरी करतो.राजकारणात असणाऱ्या वडिलांचा प्रभाव त्याच्या पुढील जीवनावर पडतो.पुढे तो मुलगा राजकारणात येतो यात तो इतका यशस्वी होतो की भारत देशाचे वित्तमंत्री,उद्योगमंत्री,परराष्ट्रमंत्री,या सारखी मानाची पदे भूषवताना तो मुलगा भारत देशाचा राष्ट्रपती होतो.तो मुलगा म्हणजे भारतीय राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व प्रणव मुखर्जी*.


*प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक सन्मान मिळाले. यात भारतीय राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांना देशातील सर्वोच्च पदांपैकी एकावर काम करण्याचा मान मिळाला.याशिवाय या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, पद्म विभूषण, त्यांना प्रदान करण्यात आला*.

*आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना ते विविध पुरस्कारचे मानकरी ठरले*.

*त्यांच्या लेखन आणि विचारसरणीसाठीही त्यांना अनेकदा  विशेष सन्मान मिळाले.त्यांच्या कार्याला मान्यता देणारे हे पुरस्कार त्यांच्या बुद्धिमत्तेचे, नेतृत्वाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत*.


*प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द 1969 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात सामील होऊन सुरू झाली.त्यानंतर, त्यांनी 1973 मध्ये लोकसभेत पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. वित्त मंत्री, उद्योग मंत्री*,

 *आर्थिक धोरण सुधारणा वेळेतील वित्त मंत्री,परराष्ट्र मंत्री काम करताना त्यांनी कायम महत्त्वपूर्ण भूमिका* *निभावली.2012 मध्ये, प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि संविधानिक महत्वाचे मुद्दे हाताळले*.

 *त्यांनी आर्थिक विकास व सुधारणा यावर भर देत, विविध धोरणांमध्ये योगदान दिले.त्यांनी भारताच्या राजकारणात* *आपल्या कार्याने मोठा ठसा ठेवला आहे*.

*त्यांचे शिक्षण आणि ज्ञान त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीत महत्त्वाचे ठरले, कारण त्यांनी अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभावीपणे काम केले.प्रणव मुखर्जी छोट्या*खेडेगावातून देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचले त्यांचे आयुष्य *आपल्याला हाच संदेश देते की प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे,तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्याची.यशाची गंमत ही नाही की तुम्ही कधीच चुकत नाही,तर ती आहे की तुम्ही चुकून शिकता आणि पुन्हा उभे राहता*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०