Posts

Showing posts from August, 2021

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-37* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *15 मार्च 1959 रोजी  मुंबईतील  गिरगाव मधील एका इमारतीच्या छतावर सात महिला एकत्र येतात. घरातील काम सांभाळून इतर काहीतरी  काम करावे हा त्यांचा एकत्र येण्याचा उद्देश असतो.मग त्या एक व्यवसाय सुरू करतात. त्यांची पहिल्या दिवसाची पहिली कमाई होती 50 पैसे.मग पुढे तो व्यवसाय वाढत जातो.7 महिला काम करणारा उद्योग 45000 हजार महिला कामगारांचा होतो.सुरवातीला कर्जाऊ घेतलेल्या 80 रुपये भांडवलाचा उद्योग सोळाशे कोटीचा होतो.ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा तो उद्योग म्हणजे श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड .*.               या उद्योगाचे वैशिष्ट्ये म्हणजे नुकसान व नफ्यात सर्व महिलांची सामूहिक जबाबदारी असते.महिलाच सहमालक असणारा जगातील एकमेव उद्योग म्हणजे लिज्जत पापड उद्योग. धर्मदाय संस्थेप्रमाणे हा उद्योग काम करतो ही उत्पादक कंपनी नाही.छगनलाल पारेख व पुरषोत्तम दामोदर यांनी सुरवातीपासून या उद्योगाला पाठिंबा दिला. .महिलांना कमीत कमी प...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-36* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *व्यापाराची पंढरी म्हणजे गुजरात राज्य.याच गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथे त्याचा जन्म  1925 मध्ये झाला.त्याचे सुरुवातीचे शिक्षण गुजरात येथेच झाले.त्याला स्वतःचा व्यवसाय असावा असे नेहमी वाटत असे.पण घरातील लोकांच्या आग्रहाखातर तो मुंबई येथे वकिली शिकण्यासाठी आला.तो वकिलही झाला.पण तेथे त्याचे मन रमत नव्हते.पुढे तो मुलगा एक कंपनी स्थापन करतो ती कंपनी भारतातीलच नाही तर जगातील नावाजलेली कंपनी बनते.ती कंपनी म्हणजे फेविकॉल बनवणारी Pidilite कंपनी.आणि हे व्यवसाय साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे फेविकॉल मॅन बलवंत पारेख*                              वकिली करायची नाही म्हणून ते काही दिवस प्रिंटींग प्रेस मध्ये काम करतात.पुढे काही दिवस लाकडाच्या वखारीत काम करतात.तेथे त्यांच्या असे लक्षात येते की जनावरांच्या चरबी पासून बनवलेला व प्रचंड उष्णता द्यावा लागणारा डिंक  लाकडे जोडतान...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-35* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *महाराष्ट्र राज्यातील वर्धा हे त्याचे गाव.23सप्टेंबर 1950 मध्ये त्याचा जन्म झाला.वडील ठाकुरदास व आई सुमन दोघेही गांधीवादी विचारांचे.गांधीजींच्या 'नई तालीम' या शिक्षण पद्धती मध्ये त्याचे शिक्षण सेवाग्राम आश्रमात झाले.त्यामुळे समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हे चिरकाल टिकणारे संस्कार त्याच्यात येथेच रुजले गेले.पुढे तो एम.बी.बी.एस झाला .तेथे त्याने तीन विषयात सुवर्णपदके मिळवली.सार्वजनिक आरोग्य, या विषयाचे शिक्षण देणारी एकही शिक्षण संस्था त्याला सापडली नाही.मग तो मुलगा आरोग्य शिक्षणाचा ध्यास घेतो.गडचिरोली सारख्या दुर्गम भागात 'सर्च ' अर्थात 'शोधाग्राम' संस्थेच्या माध्यामातून बालकांच्या मृत्यूची कारणे,यावर असे काही काम उभे करतो की, सारे जग त्याच्या समाज कार्याची दखल घेते.हे काम करणारा तो मुलगा म्हणजे डॉक्टर.अभय ठाकुरदास बंग*                            *त्यांच्या याच कार्याची दखल म्हणून त्यांना पदमश्र...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग३४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-34* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचे जीवन म्हणजे एक अखिल शोधयात्राच आहे.त्याचा जन्म 30 ऑक्टोबर 1909मध्ये मुंबई मध्ये झाला.आजोबा म्हैसूर संस्थेचे दिवाण तर वडील टाटा परिवारात अधिकारी होते.त्यामुळे विज्ञानाची ओढ त्याच्या घरातच होती.मुलांनी शिकावे आचार विचार संपादन करावे हेच घरातील संस्कार होते.तो लहान असताना त्याला निद्रानाश हा आजार झाला.खूप डॉक्टर केले पण गुण नव्हता.शेवटी एका युरोपीय डॉक्टरने सांगितले बालक महा बुद्धिमान आहे.बालक मोठे झाले की सगळे व्यवस्थित होईल.पुढे तो केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनिअर होतो.पुढे तो मुलगा  भारताच्या अणूऊर्जा संशोधन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवतो आणि जगाला भारताची दखल घ्यायला लावतो.हे प्रशंसनीय काम करणारा तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ डॉ होमी भाभा*.                                       1930 सालची त्यांची विज्ञान व संशोधन पद्धती खुप गाजली.परदेशातील अडम्स, हप्क...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -३२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-32* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *अमेरिकेमधील न्यू मेक्सिको येथे त्याचा जन्म 12 जानेवारी 1964 मध्ये झाला.लहान असल्यापासून त्याला तंत्रज्ञानाचे विलक्षण वेड होते.या वेडापायी तो इलेक्ट्रॉनिक   इंजिनिअर झाला.पुढे तो Wall Street मध्ये नोकरीला लागला.इंटरनेट वर्षाला 2300 पट वाढत आहे हे त्याच्या तेथे लक्षात आले. मग त्याने इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग ची साईड पडताळून पहिली त्याला अशी कोणतीही साईड मिळून आली नाही.त्याने त्यावेळी नोकरी सोडून ऑनलाईन वस्तू विक्रीची कंपनी काढण्याचे ठरवले. वडिलांनी साठवलेले 1 लाख डॉलर गुंतवणूक करून1994 मध्ये तो ,पत्नीआणि मित्र यांनी एक ऑनलाईन शॉपिंग कंपनी चालू केली. त्याला पुस्तके वाचायचा प्रचंड छंद होता. त्याने आपल्या कंपनी साईड वर प्रथम पुस्तकेच विकायला ठेवली.त्याला तुफान प्रतिसाद मिळाला.पुढे ती ऑनलाईन कंपनी इतकी मोठी झाली की ऑनलाईन बाजारात तिला आजपर्यंत एकही प्रबळ प्रतिस्पर्धी नाही.ती कंपनी म्हणजे ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग कंपनी. घरपोच वस्तू  देणे हे स्वप्नवत वाटणारे क...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-३१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-31* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *भारतावर इंग्रज सरकाची सत्ता होती.त्यावेळी विदेशातील अनेक पदार्थ भारतात मिळत असे.त्यात त्या काळची कँडी प्रसिद्ध होती.फक्त इंग्रज अधिकारीच ती खात असे.त्याची किंमत भारतीयांना परवडत नसे.एका मुलाला ही गोष्ट मनाला फार लागते.तो भारतात स्वदेशी कँडी  बनली पाहिजे म्हणून जर्मनीला जातो. तेथे कँडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतो.भारतात येतो ते कँडी बनवण्याचे 60 हजाराचे मशीन घेऊनच.1929 साली मुंबई मधील विले पारले येथे तो जुना कारखाना विकत घेतो.कँडी बनवायला सुरुवात करतो.पुढे1939मध्ये ती कंपनी बिस्किटे बनवते.ती बिस्किटे इतकी लोकप्रिय होतात की जगात सर्वात जास्त बिस्किटे विकणारी कंपनी बनते.6 मिलियन स्टोअर मध्ये ती बिस्किटे विकली जातात.16 मिलियन पेक्षा अधिक तिचे उत्पन्न होते. ती कंपनी म्हणजे पारले जी.आणि ती सुरू करणारा तो मुलगा म्हणजे मोहनलाल दयाळ*.                                     ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ३०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-30* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *गुजरात राज्यातील मेहसाणा येथे त्याचा जन्म 13 एप्रिल1944 मध्ये झाला.त्याचे वडील खोडीदास पटेल हे शेतकरी होते.शेतकरी कुटूंब असूनही तो आपले बी एस्सी केमिस्ट्री पर्यंत तो आपले शिक्षण पूर्ण करतो.पुढे त्याला गुजरात सरकारच्या गौण खनिज विभागात सरकारी नोकरी मिळते.विज्ञान शाखेतून शिक्षण असल्यामुळे रासायनि प्रक्रियांचे चांगले ज्ञान त्याला होते.यातून तो सुमारे तीन वर्षे मेहनत घेऊन अतिशय स्वस्त अशी कपड्याची पावडर बनवतो.पुढे ती कपड्याची पावडर भारतातच नाही तर जगात सर्वत्र विकली जाते.त्याची पावडर बनवणारी कंपनी इतकी मोठी होते की त्यात 18000 हजार कामगार काम करतात.कपड्याची पावडर बनवणारी ती कंपनी  म्हणजे  निरमा.आणि ही कंपनी स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे करसनभाई पटेल*.                                       पटेल यांना पावडरचा फॉर्म्युला सापडल्यावर  त्यांनी आपल्या लाडक्या...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - २९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-29* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *मद्रास प्रांतातील तंजावर मधील एरोड या गावी त्याचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला.घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची.वडील के श्रीनिवास कापड दुकानात सेल्समन तर आई कोमलताम्मा गृहिणी.तो पैशाने श्रीमंत नसला तरी जन्मापासून ज्ञानाने प्रचंड श्रीमंत होता. शाळेत असताना त्याची स्मरणशक्ती इतकी अफाट होती की 7 व्या वर्षी तो गणिताची विविध प्रमेय,सिद्धांत तोंडपाठ सांगत असे.हे पाहून शिक्षकही चकित होत.त्याने शाळेचे  अभ्यासक्रम  अत्यंत कमी वयात पूर्ण केले.पुढे हा मुलगा गणित  या विषयात इतका प्रसिद्ध झाला की त्याने गणिताची हजारो प्रमेय मांडली.लोक त्याला आधुनिक भास्कराचार्य म्हणू लागली. तो महान गणिततज्ञ म्हणजे श्रीनिवास रामानुजन आयंगार*                                   रामानुजन यांनी 3500 पेक्षा जास्त गणिती प्रमेय मांडली.ते आजारी असतानाही  सुमारे 600 प्रमेय त्यांनी मांडली. रामा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- २८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-28* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                           *हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे त्याचा जन्म1899 मध्ये एका ज्यू परिवारात झाला.लहानपणी तो तसा चिकित्सक होता.तो काही न काही छोटे मोठे प्रयोग करत असे. शाळेत असताना त्याला अभ्यासबरोबर चित्रकलेची प्रचंड आवड होती.पुढे तो शिकून त्याच्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करू लागला.तेथे त्याला लिहताना शाईच्या  पेनची अडचण भासू लागली.शाईचे  डाग कागदावर पडून लिखाण खराब दिसत असे.मग याने निश्चय केला की आपण डाग न पडणारा पेन शोधून काढू.पुढे या मुलाने बॉल पेनचा शोध लावून साऱ्या जगाचे लिहणे सुसहय केले.या बॉल पेनचा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे लँडीस्लावो जोस बिरो*                                   पत्रकार म्हणून काम करताना बिरो एकदा पेपर छपाई च्या कारखान्यात गेले .तेथे त्यांच्या डोक्यात एक क...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-27* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *जर्मनीतील वूटेनबर्ग मधील उल्म येथे त्याचा जन्म 14 मार्च 1879मध्ये झाला.त्याचे वडील हर्मन इंजिनिअर तर आई पौलिन गृहिणी.लहानपणी तो स्वभावाने बुजरा ,हळवा होता.त्याला बोलण्याचा त्रास होत असे त्यामुळे तो न बोलणेच पसंत करत असे.शाळेतील कडक शिस्त,घोकंपट्टी,त्याला आवडत नसे.त्याला वर्गातील ढ विद्यार्थी म्हणून चिडवले जात असे.पण हे खरे नव्हते,प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजावून घेणे हा त्याचा स्वभाव त्याला शांत बसू देत नव्हता.यामुळे तो बालपणीच  गणिती झाला.ज्या मुलाला बौद्धिक विकलांग ठरवण्यात आले होते, पुढे त्या मुलाने जगात असे काही शोध लावले की  जगातील प्रतिष्ठेचा भौतिकशास्राचा नोबेल पुरस्कार देऊन त्या मुलाचा सन्मान केला गेला.तो मुलगा म्हणजे जगातील महान शास्त्रज्ञ अलबर्ट आइनस्टाईन*                          जगाला अनेक शोधांची देणगी देणाऱ्या अलबर्ट यांना नोबेल पारितोषिका बरोबर,मत्तयुक्की पदक,कोप...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-26* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *कृष्णवर्णीय गुलाम असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म 1 जानेवारी 1964 मध्ये झाला.मिसुरी राज्यातील डायमंड ग्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या फळकूटांची झोपडी हे त्याचे जन्म ठिकाण.गुलाम म्हणून त्याचा झालेला जन्म हा त्याला जणू काही शापच होता.त्याच कारणाने त्याला कुठल्याही शाळेत 12व्या वर्षापर्यंत प्रवेश मिळाला नाही.मित्रांची पुस्तके वापरून जमेल तसे बाहेरून शिक्षण त्याने घेतले.हे करताना त्याने घरगडी,वेटर,धोबी,शेतमजूर ही कामे केली.कृष्णवर्णीय म्हणजे त्या काळी अमेरिकेत तुच्छ माणूस मानला जात असे.इतक्या बिकट परिस्थितीत तो मुलगा जिद्द न सोडता शिक्षण घेतो.शेतकीक्षेत्रात एम.एस्सी करतो.पुढे पी. एच. डी.करतो.प्रचंड मेहनत घेऊन संशोधन करतो.आणि शेंगदाण्यापासून 300, रताळे पासून 118पदार्थ बनवता येतात याचा  शोध लावतो. कापडासाठी 500 रंगाचा शोध लावतो.हे स्वप्नवत  काम करणारा तो मुलगा म्हणजे जॉर्ज वशिंग्टन कार्व्हर*.               ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-25* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *शिक्षक असणारा हा मुलगा  आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतो.त्याचा जन्म चीनमधील  हंगाचौ या छोट्याशा खेड्यात 1964 मध्ये झाला.त्याचे आई वडील गाण्याचे कार्यक्रम सादर करत असे.आपला मुलगाही आपल्या सारखा गवई व्हावा ही त्यांची इच्छा.पण त्याचे या सगळ्यात मन रमत नव्हते.एक दिवस रस्त्याने जाताना चीन मध्ये आलेल्या विदेशी पर्यटकांची इंग्रजी भाषा  त्याने ऐकली.त्यावेळी त्याने इंग्रजी शिकण्याचा निश्चय केला.ती शिकल्यावर काही दिवस इंग्रजी शिक्षक म्हणूनही काम केले.इंटरनेट हा शब्द विदेशी लोकांकडून पहिल्यांदा ऐकला.त्यावेळी इंटरनेट लोकांसाठी नवीन होते.मग पुढे त्याने अमेरिकेत जाऊन  इंटरनेट शिकायचा असा काही ध्यास घेतला की वयाच्या 32 व्या वर्षी स्वतःच्या देशाची माहिती असणारी पहिली वेबसाईट तयार केली. आज जगात 240 देशात त्याने  आपली 'अलिबाबा' ही कंपनी सुरू केली.हे इंटरनेटचे,व्यापाराचे साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे जॅक मा*         ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- २४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-24* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील सिएटल येथे त्याचा जन्म 28 ऑक्टोबर 1955मध्ये झाला.शाळेत शिकवत असलेल्या विषयात त्याचे फारसे मन रमत नव्हते.पण गणित आणि विज्ञान हे त्याचे आवडीचे विषय.शाळेत आणि कॉलेजमध्ये तो तासनतास संगणक खोलीत काहीतरी करत  बसायचा .बँकिंग मध्ये असणाऱ्या आईला त्याने त्यात करिअर करावे असे वाटे. वकिल असणाऱ्या वडिलांना तो मोठा वकिल व्हावे असे वाटे.पण त्याला या सगळ्यात काडीचा रस नव्हता.तो मुलगा लहान वयातच कंपनी स्थापन करतो.पुढे ती कंपनी जगातील संगणक प्रणाली तयार करणारी प्रथम क्रमांक ची कंपनी बनते.त्यात सुमारे 24000 हजार पेक्षा अधिक कामगार काम करू लागतात.आणि तो मुलगा सलग 11वर्षे  जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनतो.ती कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट.आणि ती कंपनी स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे बिल गेट्स.मायक्रोसॉफ्ट च्या जागतिक साम्राज्याचा एक अनभिषिक्त सम्राट*            बिल आणि त्याचा कंपनी भागीदार पॉल ॲलन यांच्या डोक्यात अफला...

जिद्दी माणसांच्या भाग - २३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-23* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *मध्यप्रदेश राज्यातील इंदौर मध्ये तिचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.गायक असणाऱ्या वडिलांनी,आणि गृहिणी असणाऱ्या आईने तिच्यासह सर्व भावंडावर उत्तम संस्कार केले.तिच्यासह चार बहिणी ,एक भाऊ असे मोठे कुटूंब.तिच्या वडिलांचे गायक आणि नाटकाची आवड यामुळे कुटूंबाचा गाडा चालत होता.पुढे ते कुटुंब महाराष्ट्रात आले.ती 13 वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन होते.ती घरात सगळ्यात मोठी असते.लहान भावंडांची सगळी जबादारी तिच्यावर येते.वडिलांनी शिकवलेले गाणे हाच तिच्यासाठी कुटूंब चालवण्याचा पर्याय असतो.ती कोलमडून न जाता वयाच्या 13 व्या वर्षी गाण्यासाठी स्टेजवर उभी राहते.ती आपल्या जादुई आवाजाने जगाला मोहिनी घालते तीहजारो गाणी गाते.ती मुलगी म्हणजे भारताची गाणं कोकिळा लता दिनानाथ मंगेशकर*                                     गेली सात दशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या,सुरेल आवाजाची दै...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-२२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-22* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *जिल्हा सातारा  असला तरी त्याचा जन्म पुण्यात 24 मार्च 1951ला झाला.लग्नानंतर जिने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर झाली अशी मेहनती आई नलिनी त्याला मिळाली. जणू काही जिद्द त्याला जन्मत:च मिळाली असावी. डॉक्टर आई  ,व्यावसायिक असणारे वडील श्री.नारायण यांनी घरात चांगले वातावरण असतानाही त्याला हट्टाने मराठी माध्यमातून शिकवले.लहानपणापासून खेळ,विविध कला,यात तो पारंगत होता.11 वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे झाल्यावर सोलापूर येथील वैशंपायन महाविद्यालयातून तो एम.बी.बी.एस तर जे जे या नावाजलेल्या महाविद्यालयातून तो भूलतज्ञ झाला.पुढे वयाच्या 35 व्या वर्षी अचानक एका डबघाईला आलेल्या सामाजिक संस्थेची सचिव म्हणून जबाबदारी त्याच्यावर येते.ते आव्हान पेलण्याची तयारी तो आपल्या सहकार्यांना दाखवतो.पुढे दोन वर्षात तो मुलगा त्या संस्थेसाठी असे काही कष्ट घेतो की एक कोटींचा कर्जाचा बोजा असणारी संस्था आर्थिक स्थितीत मजबूत तर होतेच शिवाय1550हून अधिक कर्मचाऱ्यां...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-२१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-21* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *युगोस्लोवीया देशातील स्कोपे शहरात तिचा जन्म झाला.वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले.आईने तिचे पालनपोषण केले.वयाच्या 12 व्या वर्षी त्या मुलीने निश्चय केला आपल्याला जोगीन अर्थात नन व्हायचे.ज्या वयात मुलांचे भावविश्व शाळा,खेळणे, असे असते त्याच वयात या मुलीने आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित केला.वयाच्या 18 व्या वर्षी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर लगेच सर्व सुखाचा त्याग करून जोगीणीचे व्रत तिने घेतले.ती भारतातील बंगालमध्ये कार्य करणाऱ्या लॉरेटो संघात तिने प्रवेश घेतला.येथूनच दिनदुबळ्याची सेवा करायचे त्यांनी ठरवले. यात त्यांनी इतके काम केले की जगाला त्यांची दखल घ्यावी लागली.असे समाजकार्य करणारी ती मुलगी म्हणजे आग्रेस गोन्शा बोजाहिव उर्फ मदर तेरेसा*                                  मदर तेरेसा यांचे कार्य भारतात मोती सरोवर येथे गरिबांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढून सुरू झाले....

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - २०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-20* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                                                                                                                                    *       *🇮🇳स्वातंत्र्यदिन प्रासंगिक🇮🇳*             *त्याचे आई वडील शिक्षक होते.त्यामुळे तो सुरवातीपासून खुप शिस्तप्रिय होता. हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे 9 सप्टेंबर 1974 मध्ये त्याचा जन्म झाला.लहानपणीच तो कराटे ग्रीन बेल्ट झाला,पुढे एन. सी .सी मध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यात तो कॅप्टन झाला.पण त्याला कुणी म्हटले असते की तू भारतीय सैन्य दलात खरोखर कॅप्टन...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-19* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *अमेरिकेतील वायने कौंटी मीचीगण येथे अत्यंत गरीब कुटुंबात 30 जुलै 1863 मध्ये त्याचा जन्म झाला.सर्वजण शेतात राबत होते.पण संसाराचा गाडा पुढे ढकलत नव्हता . त्याचे सुरुवातीपासूनच शेतात मन रमत नव्हते. म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने घर सोडले.पुढे एका कारखान्यात यंत्र कामगार म्हणून नोकरी करू लागला.तेथे वाफेच्या इंजिनाची त्याला चांगली माहिती झाली.इल्यू मेटिंग कंपनीत मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्याने एक कार डिझाईन केली.अशाच खुप कार आपल्या स्वतःच्या कंपनीच्या बनल्या तर असा विचार त्याच्या मनात आला.आणि त्याने 1903 साली नोकरी सोडून देऊन अत्यंत कमी भांडवलात स्वतःची एक कंपनी सुरू केली.पुढे ती कंपनी संपूर्ण जगात प्रथम क्रमांकाची कार कंपनी बनली.ती कंपनी म्हणजे फोर्ड कंपनी व ती स्थापन करणारा  तो मुलगा म्हणजे हेन्री फोर्ड.*       त्या काळी माझी स्वतःची।कार कंपनी असेल या त्यांच्या ध्येयाला सर्वजण हसले होते.पण त्यांनी जिद्दीने लावलेल्या फोर्ड कंपनी...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-18* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *कर्नाटक राज्यातील कोलार मधील मुद्देनहळ्ळी या लहानशा खेड्यात त्याचा जन्म  15 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.  त्याचे वडील श्रीनिवास संस्कृतचे पंडित तर आई व्यंकटलक्ष्मन अम्मा गृहिणी.15 व्या वर्षी त्याचे पितृछत्र हरपले. मग त्याची आर्थिक परिस्थिती खुप खालावली.मामाच्या घरी राहून तो पाच किलोमीटर महाविद्यालयात जात असे ,तेथून परत स्वतःचा खर्च  भागावा म्हणून परत 4 किलोमीटर पायी शिकवणी घ्यायला जात असे.अशा कठिण परिस्थितीत तो एल. सी.ई व एफ. सी. ई  म्हणजे आताची बी ई परीक्षा उत्तीर्ण झाला.मग अभियंता म्हणून काम करताना साऱ्या भारताला त्याने धरणावरील न गंजणाऱ्या  स्वयंचलित दरवाज्यांची देणगी दिली. ती महान व्यक्ती म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.*                धरणाचे पाणी पावसाने जास्त झाले की  त्याचे फार नुकसान होत असे.अशावेळी धरणाची उंची वाढवणे शक्य नसे मग यावर उपाय म्हणून मोक्षगुंडम यांनी न गंजणारे स्वयंचलित दर...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-17 *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *अविवाहित महाविद्यालयीन तरुणीच्या पोटी त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झाला.ती अविवाहित होती म्हणून त्याला एका वकिल दांपत्याना त्याला पूर्ण शिक्षण देणे या अटीवर  दत्तक देण्यात आले.त्यांचीही परिस्थितीत बेताचीच होती.अशा वेळी  त्याचे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सुटले.पण कॅलिओग्राफी चा छंद त्याने सोडला नाही. जेवणासाठी रिकाम्या कोकच्या बाटल्या त्याने विकल्या, रविवारी मंदिरात पोटभर जेवण मिळते म्हणून 7 मैल तो  पायी चालत जायचा.इतके सगळे कष्ट  सहन करूनही त्याने मित्राबरोबर एका छोट्या गॅरेजमध्ये एक संगणक कंपनी सुरू केली.पुढे ती कंपनी दहा वर्षात 2 बिलियन डॉलर्स आणि 4000 कामगारांची कंपनी बनली.ती कंपनी म्हणजे प्रचंड लोकप्रिय अशी ॲपल कंपनी.आणि हे स्वप्नवत काम करून दाखवणारा तो मुलगा म्हणजे स्टीव्ह जॉब्स*.                          ॲपल ने आपले ॲपल- 1,ॲपल-2 या सिरीजचे सं...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- १६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-16* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *फ्रान्सच्या कुपर्व नामक खेड्यात त्याचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला.वडील सायमन कातडी माल तयार करणारे कारागीर. तर आई शेतकऱ्याची  मुलगी.दोन बहिणी आणि एक भावाच्या नंतर याचा जन्म.त्यामुळे तो घरात सर्वांचा लाडका होता.एक दिवस वडिलांच्या वर्कशॉप मध्ये गेल्यावर त्यांची काम करणारी अरी  त्याने सहज हातात घेतली.वडीलांप्रमाणे ती तो चालवायला गेला आणि ती डोळ्यात घुसली.डॉक्टरांनी खुप प्रयत्न केले डोळ्यावर उपचार झाले पण काही दिवसांनी त्या डोळ्याला झालेला संसर्ग दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला.त्याचे दोन्हीही डोळे काढून टाकावे लागले.तरीही तो डगमगला नाही.मोठे होऊन त्याने स्वतः अंध असूनही अंधांना वाचता येईल अशीजगप्रसिद्ध 'ब्रेल ' लिपी बनवली.तो मुलगा म्हणजे ब्रेल लिपीचा निर्माता  लुई सायमन ब्रेल* या लिपी द्वारे अंध मनुष्य हातांच्या बोटांनी उठाव टिंबाना  स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकतो.एक सटात 6 बिंदूची रचना असते.बोटांच्या पेराने अंध व्यक्ती एका ओळीत किती अक्षरे ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-15* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *शिक्षक असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1946 मध्ये झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा हे त्याचे जन्मगाव.बालपणीचे शिक्षण गावातील राममंदिरात झाले.कारण त्यावेळी गावात शाळेसाठी इमारत नव्हती.पुढे नागपूर येथे त्याने इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर तो त्रिवेंद्रम येथे इलेक्ट्रॉनिक रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर चा संचालक बनला.अमेरिकेने मा.पंतप्रधान राजीव गांधी यांना महासंगणक तंत्रज्ञान द्यायचे नाकारले तेव्हा याने भारतातच भारतीय महासंगणक बनवण्याचे आव्हान स्वीकारले.आणि   'परम'अर्थात 'सर्वोच्च' महासंगणक बनवून साऱ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली.असे अशक्य ते शक्य करून दाखवणारा तो मुलगा म्हणजे भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. विजय पांडुरंग भटकर*. संशोधक, लेखक, शिक्षणतज्ञ अशी बहुआयामी ओळख असलेले व्यक्तीमत्व.  भारताच्या संगणक क्रांतीचे शिल्पकार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना  आजवर...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-14* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचा जन्म वॅलवर्थ येथे 16 एप्रिल 1889 मध्ये झाला.त्याचे जीवन अत्यंत दारिद्र्यात लंडनच्या झोपडपट्टीत गेले.त्याचे आई वडील नाच गाण्याचे कार्यक्रम करत असे.पण कुटुंबाची परिस्थिती नेहमीच हलाखीची असे.त्यामुळे त्याला  बोलण्यापूर्वी गाणे शिकवले गेले.आणि तो चालू  लागला तेव्हाच नाचू लागला.वयाच्या पाचव्या वर्षी त्याने रंगमंचावर पाऊल ठेवले.तो सहा वर्षाचा असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला.पुढील वर्षी वडिलांचे निधन झाले.आईची रंगमंचावरील कारकिर्दी संपली.आईला मानसिक आजाराने ग्रासले म्हणून त्याला अनाथश्रमात ठेवण्यात आले. .मोठा भाऊ जहाजावर कामाला निघून गेला.  आता तो एकटा पडला,  त्याने शाळा सोडली .बारीक सारीक कामे करत तो रस्त्यावर राहू लागला.इतक्या कठिण परिस्थितीतही तो लोकांना एकाच वेळी हसवणारा आणि रडवणारा जगविख्यात कलाकार बनला तो कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन* 19 13 साली त्याने चित्रपट जगतात प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलेच नाही .द किल्ड,द गोल्ड रश,मॉ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-13* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *हरियाणा राज्यातील पानिपत येथील खंडरा हे त्याचे गाव.वडील सतीश कुमार व आई सरोज देवी यांच्या पोटी त्याचा जन्म 24 डिसेंबर 1997 साली झाला.घरी एकत्र कुटूंब पद्धती यातच तो  मोठा होत होता.मोबाईल वर भालाफेकी खेळाचे व्हिडीओ पाहून आपणही असे काहीतरी करावे असे त्याला वाटे.मग मोठा झाल्यावर गावापासून 17 किलोमीटर दूर तालुक्यातील मैदानावर सरावासाठी तो जाऊ लागला.सुरुवातीला चांगला भाला घ्यायला पैसे नसायचे मग 5 हजार ते 7 हजारपर्यंत चे भाला घेऊन तो सराव करत असे.खेळाच्या जोरावर तो राष्ट्रीय पातळीवर खेळू लागला मग त्याने  मागे वळून न पाहता यशाची अशी काही उंची गाठली की 7 ऑगस्ट 2021 मध्ये त्याने भारताला ऑलम्पिक इतिहासात भालाफेकीचे  पहिले सुवर्ण मिळवून दिले.टोकियो ऑलम्पिक येथे भारताचे राष्ट्रगीत वाजताना सर्व तमाम भारतात आनंदाची लहर आली. अशी अलौकिक कामगिरी करणारा महान खेळाडू म्हणजे नीरज चोप्रा* नीरज यांना आतापर्यंत एशियन गेम्स,कॉमनवेल्थ गेम्स,साऊथ एशियन गेम्स,वल्ड ज्युनियर ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १ - प्रिया मलिक

Image
 

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १२

Image
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-12* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचा जन्म सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे 8 डिसेंबर 1993 मध्ये शेतकरी  कुटुंबात झाला.पहिलवान असणाऱ्या वडिलांना वाटे आपल्या मुलानेही पैलवानकी करावी.पण कुस्तीच्या खेळात  कानावर मारणे त्याला अजिबात आवडत नसे.त्यात त्याचे मनही रमत नव्हते. गावातील सरकारी शाळेत शिक्षण  घेत असताना त्याला कबड्डी खेळाची आवड लागली.वडिलांनी कुस्ती सोडून कबड्डी खेळायला परवानगी दिली.मग त्याचा खेळ असा काही बहरला की तो खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय कबड्डी संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला.तो  कबड्डी खेळाडू म्हणजे उत्तम चढाई पट्टू काशीलिंग अडके ऊर्फ काशी* काशीलिंग चा खेळ पाहून भारतीय क्रिडा प्राधिकरण यांनी (SPORT AUTHERITY OF INDIA -SAI) त्याला गुजरात येथे प्रशिक्षण ला पाठवले .त्याचेच फळ म्हणून 2014 प्रो कबड्डी लीग मध्ये त्याची दिल्ली संघाकडून निवड झाली.यात 39 सामन्यात 302 गुण घेणारा आणि एका सामन्यात  चढाईत 24 गुण घेणारा एकमेव खेळाडू म्हणजे काशीलिंग. साऊथ एशियन गेम मध्ये...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-11* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचा जन्म हरियाणा राज्यातील सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात झाला.त्याची घरची परिस्थिती बेताचीच.त्याच्या वडिलांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही. कुटुंबातील सर्वांचे पोट भरावे म्हणून ते इतरांची जमीन वाट्याने करत.आपल्या मुलाने  कुस्ती खेळात नाव कमवावे ही बापाची इच्छा.   पोराचा कुस्तीचा सराव बुडतो म्हणून  गावापासून 40 किलोमीटरवर स्वतः फळे आणायला  जाणारे वडील त्याला लाभले.याच जिद्दीने त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले तेव्हा  त्याचे वडील  तो क्षण पहायला नव्हते कारण त्यावेळी ते शेतात काम करत होते.अशा परिस्थितीत तो चिकाटीने कुस्ती शिकत होता. शेवटी तो यशस्वी ठरलाच टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धेत 5 ऑगस्ट 2021 रोजी 57 किलो वजनी गटात  सिल्वर पदक जिंकून  देशाची मान त्याने अभिमानाने उंचावेल असे यश मिळवले .शिवाय वडिलांच्या ही कष्टाचे चीज केले.तो महान खेळाडू म्हणजे रवी दहिया उर्फ विजय कुमार* सन 2015 मध्ये ज्युनियर जागतिक...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-10* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *आसाम राज्यातील गोलघाट मधील बाडा मुखींया हे तीचे गाव.2 ऑक्टोबर 1997 साली आई मॅमोनी यांच्या पोटी तिचा जन्म झाला.तीचे  वडील टिकेन लघुउद्योजक. ती शाळेत असताना पदुम बोरो यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.तीने प्रथम किक बॉक्सर म्हणून कारकिर्दीस सुरवात केली .संधी मिळताच मुष्टियुद्धाकडे वळली .पुढे तीचे प्रशिक्षक होते शिव सिंह.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती  कसेलेली खेळाडू बनली.  जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटात  टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये भारताला पाहिले ब्राँझ पदक जिंकून देण्याचा अचाट पराक्रम तीने  केला.असे यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे लवलीना बोरगोहेन.* लवलीना ने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धा कांस्यपदक, आशियाई स्पर्धा कांस्य पदक,आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, मिळवले आहे. तिच्या याच कार्याची दखल घेत तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.ऑलम्पिक मध्ये पात्र ठरणारी ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*  *📝भाग-9* *📝श्री . चंद्रकांत बोऱ्हाडे* *उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर हे तालुक्यापासून दहा पंधरा किलोमीटर दूर असणारे तिचे गाव.आई, आजीने रोज शेतात राबने ,प्रसंगी चार घरची धुनी -भांडी  केली तर पोट भरणार अशी  घरची परिस्थिती.मुलीचा भक्कम आधार असणारे वडील अपंग.घरात कुणीही शिकले सवरलेले नाही. अशा खडतर परिस्थितीत श्रीपती भोसले  हायस्कूल मध्ये तिने प्रवेश घेतला.वयाच्या पाचव्या वर्षांपासून तीने खो-खो खेळायला सुरुवात केली.तिच्या प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जणू  तिच्यासाठी ऊर्जाच होती.तिला या खेळाने इतके मोठे केले की, एक लहानशा खेड्यातील मुलगी भारतीय खो -खो संघाची कर्णधार बनली.आणि प्रचंड यशस्वी ही ठरली .ती मुलगी म्हणजे खो-खो खेळातील सुवर्ण कन्या  सारिका सुधारकर काळे*. 2006-2007 साली महाराष्ट्र खो-खो संघात  तिची निवड झाली .मग  तिने आपल्या चपळ खेळाच्या जोरावर भारतीय खो-खो संघाच्या कर्णधार  पदापर्यंत झेप घेतली. इतक्या ग्रामीण भागातील मुलीने देशपातळीवर नेतृत्व करणे सोपी गोष्ट नव्हती.या सांघिक खेळात आपल्या खेळाच्या जोरावर...
Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-8* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *तीचे वडील रविंद्र नौदलात अधिकारी  तर आई सुनीता उत्तम हॉलीबॉलपटू व क्रिकेटपटू होती.मूळातच  खेळाचा वारसा असणाऱ्या घरात तिचा जन्म 12 सप्टेंबर1980 ला कोल्हापूरात झाला.वडिलांकडे पाहून तिला वर्दीचे प्रचंड आकर्षण होते.या वेडापायी तीने कॉलेजमध्ये एन. सी.सी मध्ये  भाग घेतला.पण घडले भलतेच तिला तिथे नेमबाजीची आवड लागली.मग मात्र तिने नेमबाजी याच खेळाला सर्वस्व दिले.अनेक अडचणींवर मात करत ती इतकी यशस्वी झाली की जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.अशी अविस्मरणीय कामगिरी करणारी ती मुलगी म्हणजे मराठमोळी तेजस्विनी सावंत*.   नेमबाजी या खेळात भारतात एका महिला खेळाडूने इतके यश मिळवने हीच महाराष्ट्र राज्यासाठी गौरवाची बाब होती. तेजस्विनी म्हणजे 10 मीटर नेमबाजी प्रकारात कसलेली खेळाडू. तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक,मेलबर्न येथे दोन सुवर्णपदके,जर्मनी येथे 50 मीटर रायफल प्रकारात 2 सुवर्णपदके तर मिळवलीच. शिवाय राष्ट्रीय स...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-7* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150249                 *प्रासंगिक* *वडील पी.वी.रमण व आई पी.विजया या उत्तम हॉलीबॉल खेळाडू असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी 5 जुलै 1995 मध्ये तिचा जन्म झाला. हैद्राबाद मधील पुसारला हे तिचे गाव.वयाच्या आठव्या वर्षांपासून ती बॅडमिंटन या खेळाकडे वळाली.तीचे लहानपणीचे प्रशिक्षक होते मेहबूब अली त्यांना तिच्या क्षमतेचा अंदाज आला होता .मग  त्या मुलीला आपल्या पेक्षा कुणीतरी आणखी चांगले बॅडमिंटन शिकवणारे हवे  म्हणून तिचा प्रवेश गोपीचंद अकॅडमी मध्ये झाला.तेथे तिचे प्रशिक्षक होते पुल्लेला गोपीचंद .तेथे तिचा खेळ असा काही बहरला की एकामागून एक जागतिक स्पर्धा ती जिंकत गेली .आणि एक दिवस त्या मुलीने सलग दोन ऑलम्पिक स्पर्धेत  पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला होण्याचा मान मिळवला .हे अविश्वसनिय स्वप्न सत्यात आणणारी ती मुलगी म्हणजे पुसारला वेंकटा सिंधू अर्थात पी.व्ही.सिंधू.* सिंधूला बॅडमिंटन कोर्ट वरील साम्राज्ञी ही उपाधी सार्थ ठरते.डच ओपन स्पर्...

गोष्टी -जिद्दी माणसांच्या भाग ५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-5* *📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*       8308677799       8806150248 *केरळ राज्यातील कोझिकोड येथील पय्योली या छोट्या खेड्यात वडील पाइथल आई लक्ष्मी यांच्या पोटी ती जन्माला आली.घरची परिस्थिती गरिबीचीच.इतक्या लहानपणी तिची काटक शरीर यष्टी  ,चपळता,धावण्याची पद्धत सारे काही डोळ्याचे पारणे फेडणारे होती*. *ती शाळेत चौथीत असताना तीचे बालपणीचे गुरू बाळकृष्णन यांनी तिला* *जिल्हास्तरावरील स्पर्धकाबरोबर धावायला लावले, ती धावली आणि काय आश्चर्य ती जिंकली सुद्धा.वयाच्या 13 व्या वर्षी तिने धावण्याचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.मग तीने मागे वळून पाहिले नाही .पुढे ती देशासाठी धावत राहिली ,ती इतकी धावली  की आंतरराष्ट्रीय पदकांचे शतक करणारी एकमेव भारतीय धावपटू ठरली .ती महान खेळाडू म्हणजे भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा.यावेळी तिचे गुरू होते नंबियार सर. उडनपरी,पय्योली एक्सप्रेस, गोल्डन गर्ल , मैदानाची राणी ही सारी तिचीच नावे* पी.टी. उषा ने आपल्या सुवर्ण कारकिर्दीत1985 मध्ये जकार्ता येथे 6 पदके,1986 मध्ये दक्षिण कोरिया येथे 5पदके, अश...

गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग ४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-4* *📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*       8308677799       8806150248 *मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड हे त्याचे गाव .वयाच्या पाचव्या वर्षी त्याची आई त्याला  कायमची सोडून जाते.पहिलवान असणाऱ्या वडिलांना आपल्या मुलानेही पहिलवान होऊन कुस्तीला वैभव मिळवून द्यावे असे वाटत होते. मोठा झाल्यावर वडिलांच्या स्वप्नांसाठी तो मल्ल विद्देच्या खडतर तपश्चर्येसाठी कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत दाखल होतो .तेथे  त्याचे  गुरू  होते पै.गणपत खेडकर  .प्रचंड मेहनत,शांत स्वभाव,जबरदस्त आत्मविश्वास हे कुस्तीचे सारे गुण त्याच्या अंगी जन्मजातच  टिच्चून भरले होते.दिल्लीचा मल्ल सतपालने महाराष्ट्राचा मल्ल दादू चौगुलेला  पराभूत करून फरपटत मैदानात मध्यभागी आणून जो विजयाचा उन्माद दाखवला होता .तो लोकांना अजिबात आवडला नव्हता. कुस्तीशौकिंनासाठी असणारी ही भळभळती जखम कुणीतरी पुसायला हवी असे सर्वांना वाटत होते. पण सतपालशी मुकाबला करायला कुणी तयार नव्हते .कारण दुहेरी पट व बकरी पछाड हे त्याचे दो...

गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग ३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-3* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *पुणे जिल्ह्यातील एक कुटूंब पोटासाठी बँगलोर शहर गाठते.घरची परिस्थिती बेताचीच. आई गृहिणी, वडील हवालदार. जेमतेम पगारात खर्चाचे तोंडाला तोंड मिळत असे.अशावेळी तीन भावंडा नंतर त्याचा जन्म होतो .कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना, कठिण परिस्थितीत त्याची आई जिजाबाई त्याला कायमची सोडून जाते. सगळे संपले असेच त्याला वाटते,तो कोलमडून पडलेला असतानाही वडील रामोजीराव व भावंडांसाठी जिद्दीने उभा राहतो.म्हैसूर मिल मध्ये काम करताना प्रसंगी तांदळाच्या गोण्या उचलतो.बँगलोर परिवहन सेवेत कंडक्टर म्हणून काम करतो. हा तरुण म्हणजेच प्रचंड मेहनतीने भारतीय चित्रपट सृष्टीत अफाट,अचाट असे कर्तृत्व गाजवणारा शिवाजी गायकवाड ऊर्फ रजनीकांत होय*  बालचंदर नावाचे दिग्दर्शक शिवाजीला पहातात. त्याची तिकीटाचे पैसे देण्याची नजाकत,लकब, विद्युतलतेसारखी चपळता त्यांना मोहून टाकते. त्यांचे ठरते आपल्या पुढिल चित्रपटात नायक हाच असेल ते त्याला आपल्या चित्रपटात पहिली संधी देतात. तो त्या संधीचे सोने क...