गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२६

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-26*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*कृष्णवर्णीय गुलाम असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म 1 जानेवारी 1964 मध्ये झाला.मिसुरी राज्यातील डायमंड ग्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या फळकूटांची झोपडी हे त्याचे जन्म ठिकाण.गुलाम म्हणून त्याचा झालेला जन्म हा त्याला जणू काही शापच होता.त्याच कारणाने त्याला कुठल्याही शाळेत 12व्या वर्षापर्यंत प्रवेश मिळाला नाही.मित्रांची पुस्तके वापरून जमेल तसे बाहेरून शिक्षण त्याने घेतले.हे करताना त्याने घरगडी,वेटर,धोबी,शेतमजूर ही कामे केली.कृष्णवर्णीय म्हणजे त्या काळी अमेरिकेत तुच्छ माणूस मानला जात असे.इतक्या बिकट परिस्थितीत तो मुलगा जिद्द न सोडता शिक्षण घेतो.शेतकीक्षेत्रात एम.एस्सी करतो.पुढे पी. एच. डी.करतो.प्रचंड मेहनत घेऊन संशोधन करतो.आणि शेंगदाण्यापासून 300, रताळे पासून 118पदार्थ बनवता येतात याचा  शोध लावतो. कापडासाठी 500 रंगाचा शोध लावतो.हे स्वप्नवत  काम करणारा तो मुलगा म्हणजे जॉर्ज वशिंग्टन कार्व्हर*. 


              जॉर्ज यांच्या संशोधनाची दखल घेऊन अमेरिका सरकारने त्यांना रुझवेल्ट मेडेल देऊन  त्यांचा सन्मान केला. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन,जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नंतर अमेरिकेत ज्यांचे स्मारक आहे अशी एकमेव व्यक्ती म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.सुमारे 210 एकरात पसरलेले हे स्मारक त्यांच्या कार्याची जाणीव करून देते. शेंगदाण्यापासून चीज,दूध,कॉफी, पीठ ,शाई,रंग ,इत्यादी 300पदार्थ तर रताळ्यापासून पीठ ,काकवी, व्हिनेगर,रबर ,शाई असे 118 हून अधिक पदार्थ बनवता येतात हे जॉर्ज यांचे संशोधन गरीब शेतकऱ्यांना वरदान ठरले.रताळे आणि शेंगदाण्याची शेती वाढली आणि त्यांचे जीवनमान उंचावले. जगाच्या इतिहासात हे संशोधन मानाचे पान ठरले.त्यांनी वस्रावर लावायचे 500 हून अधिक रंग शोधून साऱ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली.  

                     

*जॉर्ज यांच्या शोधाची वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती चे रक्षण आणि मानवी जीवनाची समृद्धी हेच होते.निगर्वी, शांत सौम्य, व्यक्तिमत्त्व, मितभाषी,असणारे जॉर्ज यांनी आपली सारी कमाई कार्व्हर रिसर्च फाउंडेशन मध्ये कृषी संशोधनासाठी खर्च केली. हा माणूस इतका मोठा संशोधक असून सुद्धा शेतकऱ्यांना शोधाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जेसम वॅगन या बैलगाडी सारख्या वाहनातून फिरत असे.जॉर्ज यांनी शेतीसाठी जे काम केले ते अविस्मरणीय असेच आहे. जॉर्ज यांनी आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग ज्या समाजाने त्यांचे जगणे कायम नाकारले त्या समाजासाठीच केला.हे करताना त्यांनी लोक कसे वागतात,कसे अडचणी आणतात,या कडे दुर्लक्ष करत तुमचे काम निष्ठेने करत रहा  मग तुम्ही आदर्श होताच होता हाच वस्तुपाठ जणू घालून दिला.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०