गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - २०
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-20*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
* *🇮🇳स्वातंत्र्यदिन प्रासंगिक🇮🇳*
*त्याचे आई वडील शिक्षक होते.त्यामुळे तो सुरवातीपासून खुप शिस्तप्रिय होता. हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे 9 सप्टेंबर 1974 मध्ये त्याचा जन्म झाला.लहानपणीच तो कराटे ग्रीन बेल्ट झाला,पुढे एन. सी .सी मध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यात तो कॅप्टन झाला.पण त्याला कुणी म्हटले असते की तू भारतीय सैन्य दलात खरोखर कॅप्टन होणार आहे तर स्वप्न वाटले असते.1996 मध्ये भारतीय सैन्य अकादमी मध्ये त्याची निवड झाली.डेहराडून ला 19 महिने तर बेळगावात कमांडो चे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो जम्मू काश्मीर रायफलमध्ये कॅप्टन पदावर रुजू झाला.त्याच काळात भारतीय देशभक्तीला ठेच लागेल असे काम पाकिस्ताकडून घडले आणि 1999 साली कारगील युद्ध सुरू झाले.यात त्या शूर मुलाने असे काही अतुलनीय शौर्य गाजवले की साऱ्या भारताने त्याला सलाम केला हे अजरामर काम करणारा तो मुलगा म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा.*
कारगील युद्धात 5140 या अवघड शिखरावर विक्रम यांच्या तुकडीने ताबा मिळवला.हे काम फत्ते झाल्यावर भारतीय सैन्य दलाच्या इतिहासातील सर्वात कठिण मिशन म्हणजे 4875 शिखर सर करणे.16000 फूट वर पाकिस्तानी सैन्य होते.या शिखरावर चढाई करताना बत्रा यांना वीरमरण आले.त्याआधी त्यांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते.4875 या शिखराला आता *बत्रा टॉप* असे म्हणतात.या महान सुपुत्राला सैन्य दलातील सर्वोच्च असणारा *परमवीर चक्र* हा पुरस्कार मरोणोत्तर प्रदान करण्यात आला.
*भारतीय लष्कर छावणीतील अनेक इमारतींना बत्रा यांचे नाव आहे.शेरशहा हा त्यांच्या जीवनावरील चित्रपट त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो.7जुलै 1999 मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली.तेव्हा पासून आजपर्यंत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी डिंपल चिमा ही तरुणी अजूनही अविवाहित आहे.इतके प्रेम बत्रा यांनी डिंपल यांना दिले होते.कारगील युद्धानंतर दोघांचे लग्न होणार होते पण ते स्वप्न अपुरे राहिले.असा हा महान सुपुत्र वयाच्या अवघ्या 24 - 25 व्या वर्षी स्वतःच्या स्वार्थाचा ,परिवाराचा कुठलाही विचार न करता देशासाठी शहिद होतो.मरण समोर असतानाही ये दिल मांगे मोअर असे म्हणतो.हे सारे करताना रगारगात देशप्रेम असावे लागते. देशासाठी मारायला आणि प्रसंगी मरायलाही जिगरबाज काळीज लागते.ते विक्रम बत्रा यांच्याकडे होते.म्हणून ते देशासाठी असामान्य ठरले. अशा या महान विरपुत्राच्या देशभक्तीला मानाचा सलाम.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*

Comments
Post a Comment