गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-13*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*हरियाणा राज्यातील पानिपत येथील खंडरा हे त्याचे गाव.वडील सतीश कुमार व आई सरोज देवी यांच्या पोटी त्याचा जन्म 24 डिसेंबर 1997 साली झाला.घरी एकत्र कुटूंब पद्धती यातच तो  मोठा होत होता.मोबाईल वर भालाफेकी खेळाचे व्हिडीओ पाहून आपणही असे काहीतरी करावे असे त्याला वाटे.मग मोठा झाल्यावर गावापासून 17 किलोमीटर दूर तालुक्यातील मैदानावर सरावासाठी तो जाऊ लागला.सुरुवातीला चांगला भाला घ्यायला पैसे नसायचे मग 5 हजार ते 7 हजारपर्यंत चे भाला घेऊन तो सराव करत असे.खेळाच्या जोरावर तो राष्ट्रीय पातळीवर खेळू लागला मग त्याने  मागे वळून न पाहता यशाची अशी काही उंची गाठली की 7 ऑगस्ट 2021 मध्ये त्याने भारताला ऑलम्पिक इतिहासात भालाफेकीचे  पहिले सुवर्ण मिळवून दिले.टोकियो ऑलम्पिक येथे भारताचे राष्ट्रगीत वाजताना सर्व तमाम भारतात आनंदाची लहर आली. अशी अलौकिक कामगिरी करणारा महान खेळाडू म्हणजे नीरज चोप्रा*


नीरज यांना आतापर्यंत एशियन गेम्स,कॉमनवेल्थ गेम्स,साऊथ एशियन गेम्स,वल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप,या सर्व स्पर्धेत सुवर्ण पदके मिळाली आहे.विविध स्पर्धेत त्यांनी 30 हून अधिक पदके मिळवली आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.87 मीटर पेक्षा अधिक लांब भाला फेकणारा हा एकमेव खेळाडू आहे.यावरून त्याची उच्च प्रतीची खेळाची गुणवत्ता समजते.


*त्याच खेळाचे फलित म्हणूनच भारतीय सैन्य दलाने त्यांना नायब सुभेदार हे पद बहाल केले आहे.अंजु बॉबी जॉर्ज नंतर विश्व चॅम्पियनशिप जिंकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा.शेतकरी कुटूंबात जन्म झाला तरी नीरज चे ध्येय ठरले होते.त्या दिशेने जाताना त्याने दिवसातील आठ आठ तास सराव केला.यशस्वी होण्यासाठी घाम गाळला .तेव्हा कुठे त्याच्या आयुष्याला गोडी आली.नीरज च्या जीवनातून हेच शिकायचे अन्नच नाही तर आयुष्यही शिजत ठेवावे लागते.कणकण उकळू द्यावे लागते.मगच आयुष्याला गोडी येते.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्ट माझ्या आईची भाग-२०

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०८