गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -३२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-32*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*अमेरिकेमधील न्यू मेक्सिको येथे त्याचा जन्म 12 जानेवारी 1964 मध्ये झाला.लहान असल्यापासून त्याला तंत्रज्ञानाचे विलक्षण वेड होते.या वेडापायी तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाला.पुढे तो Wall Street मध्ये नोकरीला लागला.इंटरनेट वर्षाला 2300 पट वाढत आहे हे त्याच्या तेथे लक्षात आले. मग त्याने इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग ची साईड पडताळून पहिली त्याला अशी कोणतीही साईड मिळून आली नाही.त्याने त्यावेळी नोकरी सोडून ऑनलाईन वस्तू विक्रीची कंपनी काढण्याचे ठरवले. वडिलांनी साठवलेले 1 लाख डॉलर गुंतवणूक करून1994 मध्ये तो ,पत्नीआणि मित्र यांनी एक ऑनलाईन शॉपिंग कंपनी चालू केली. त्याला पुस्तके वाचायचा प्रचंड छंद होता. त्याने आपल्या कंपनी साईड वर प्रथम पुस्तकेच विकायला ठेवली.त्याला तुफान प्रतिसाद मिळाला.पुढे ती ऑनलाईन कंपनी इतकी मोठी झाली की ऑनलाईन बाजारात तिला आजपर्यंत एकही प्रबळ प्रतिस्पर्धी नाही.ती कंपनी म्हणजे ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग कंपनी. घरपोच वस्तू देणे हे स्वप्नवत वाटणारे काम ज्या मुलाने यशस्वी केले तो मुलगा म्हणजे जेफ बेझोस*
काही लाखात सुरू झालेल्या ॲमेझॉन कंपनीची संपत्ती151 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.पुढे कंपनीने जगभर पाय रोवले.जगातील सर्वात मोठी ऑनलाईन बिझनेस कंपनी ॲमेझॉन आहे.अँपल नंतर सर्वात श्रीमंत कंपनी म्हणजे ॲमेझॉन.या कंपनीत तीन लाखापेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.अमेझॉन ची 2007 ची 'कोणतेही पुस्तक डाउनलोड करून वाचा 'ही ई बुक संकल्पना त्या काळात तुफान लोकप्रिय ठरली.अमेझॉन नावात खालच्या बाजूने A पासून Z पर्यंत एक बाण आहे याचा अर्थ असा आम्ही सर्व वस्तू विकतो असा आहे.ॲमेझॉन या जगातील सर्वात लांब नदीप्रमाणे आमचा व्यवसाय वाढत जाईल हे कंपनीच्या नावाचे गमक आहे.
*ॲमेझॉनची -ॲमेझॉन प्राईम,व्हिडिओ ,अडिओ हे इंटरनेट जगतातील आणखी लोकप्रिय प्लँटफॉर्म.बेझोस यांनी Blue Origin कंपनी स्थापन केली आहे.2 ते 3 लाख लोकांना अंतराळात राहता यावे अशी ती कल्पना आहे.यावर सद्या संशोधन चालू आहे.तीन संगणकावर एका गॅरेज मध्ये चालू झालेली कंपनी तीन लाख कामगारांपर्यंत जाऊन पोहचली.गमतीची गोष्ट म्हणजे ॲमेझॉन कंपनीचे सुरुवातीचे नाव CADABRA. COM हे होते ते तीनच महिन्यांत बदलून अमेझॉन केले. बेझोस म्हणतात तुमचा ब्रँड म्हणजे तुम्ही तेथे उपस्थित नसताना तेव्हा इतर लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावरून तुमच्या कामाची किंवा वस्तूची गुणवत्ता ठरते.हीच गुणवत्ता बेझोस यांनी जपली म्हणून ते आयुष्यात प्रचंड यशस्वी झाले*.

Comments
Post a Comment