*📝गोष्ट माझ्या आईची* *📝 .*रवींद्र साठे - विख्यात गायक* 📔 *भाग - 20* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *माझ्या आईचा जन्म सोलापूर मध्ये झाला.तिचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते.माझ्या आईचे नाव शकुंतला होते.माझ्या आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि तेवढाच करारी होता.पानशेत धरण फुटून आमचा वाडा त्यात भुईसपाट झाला.तरीही आई खचली नाही तिने घर तर बांधलेच पण घर, प्रपंच, पै पाहुणे हे सारे ती सांभाळत असे*. *तिच्या कार्यतत्परतेेचा आमच्यावर नकळत संस्कार झाला.माझ्या वडिलांना गाणे,हार्मोनियम येत होते.मी अभ्यासात फार चमकत नसलो तरी मनात आणि ओठात गाणेच होते.आई वडिलांनी ते जाणले आणि मला त्यासाठी प्रेरणा दिली.माझे गायन लोकप्रिय होऊ लागले तेव्हा तिला खूप बरे वाटायचे. कोणत्याही क्षेत्रात जा,पण तिथे कर्तबगारी दाखवा,हा स...
Comments
Post a Comment