गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१४

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-14*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*त्याचा जन्म वॅलवर्थ येथे 16 एप्रिल 1889 मध्ये झाला.त्याचे जीवन अत्यंत दारिद्र्यात लंडनच्या झोपडपट्टीत गेले.त्याचे आई वडील नाच गाण्याचे कार्यक्रम करत असे.पण कुटुंबाची परिस्थिती नेहमीच हलाखीची असे.त्यामुळे त्याला  बोलण्यापूर्वी गाणे शिकवले गेले.आणि तो चालू  लागला तेव्हाच नाचू लागला.वयाच्या पाचव्या वर्षी त्याने रंगमंचावर पाऊल ठेवले.तो सहा वर्षाचा असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला.पुढील वर्षी वडिलांचे निधन झाले.आईची रंगमंचावरील कारकिर्दी संपली.आईला मानसिक आजाराने ग्रासले म्हणून त्याला अनाथश्रमात ठेवण्यात आले. .मोठा भाऊ जहाजावर कामाला निघून गेला.  आता तो एकटा पडला,  त्याने शाळा सोडली .बारीक सारीक कामे करत तो रस्त्यावर राहू लागला.इतक्या कठिण परिस्थितीतही तो लोकांना एकाच वेळी हसवणारा आणि रडवणारा जगविख्यात कलाकार बनला तो कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन*


19 13 साली त्याने चित्रपट जगतात प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलेच नाही .द किल्ड,द गोल्ड रश,मॉर्डन टाइम्स, द ग्रेट डिक्टटर,द लाइट लाइट हे चार्ली चे चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहलचले.द ट्रम्प ने त्याला कायमचे सिने व्यक्तिमत्त्व दिले. डोक्यावर डब्रि हॅट,घट्ट कोट,सैल विजार,टूथब्रश मिशा असणारा कलाकार दिनदुबळ्या लोकांना आपला वाटला.


*एकूण दोनच वर्षे चार्ली शाळेत गेला.आपले दारिद्रय, भयाण ,पोरके दिवस तो कधीच विसरला नाही.तेच दुःख त्याच्या अभिनयात सहज आले.चार्लीच्या आयुष्यात ज्या अडचणी होत्या तितक्या तर आपल्या आयुष्यात नक्कीच नाही.भटका, एकाकी ,कंगाल ,आतून प्रचंड दुःखी असणारा हा माणूस साऱ्या जगाला हसवता हसवता सहज रडवत  राहिला.आपल्याला चार्लीचे आयुष्य हेच सांगत राहते. आयुष्यात कुठलीही किंमत मोजावी लागली तरी जीवन जगायचे .आत्महत्येसारखा मार्ग निवडणे हा वेडेपणा आहे.तुमचे आयुष्य सोडून तुमच्याकडे  काहीच गमावण्यासारखे नसते.या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते तुमचा वाईट काळही. शेवटी काय तर आपल्या स्वप्नांचे थवे आभाळभर पसरवून ती स्वप्न दुसऱ्याला पूर्ण करून दाखवायला अंगात प्रचंड  हिंमत लागते* .

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०