गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-25*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*शिक्षक असणारा हा मुलगा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतो.त्याचा जन्म चीनमधील हंगाचौ या छोट्याशा खेड्यात 1964 मध्ये झाला.त्याचे आई वडील गाण्याचे कार्यक्रम सादर करत असे.आपला मुलगाही आपल्या सारखा गवई व्हावा ही त्यांची इच्छा.पण त्याचे या सगळ्यात मन रमत नव्हते.एक दिवस रस्त्याने जाताना चीन मध्ये आलेल्या विदेशी पर्यटकांची इंग्रजी भाषा त्याने ऐकली.त्यावेळी त्याने इंग्रजी शिकण्याचा निश्चय केला.ती शिकल्यावर काही दिवस इंग्रजी शिक्षक म्हणूनही काम केले.इंटरनेट हा शब्द विदेशी लोकांकडून पहिल्यांदा ऐकला.त्यावेळी इंटरनेट लोकांसाठी नवीन होते.मग पुढे त्याने अमेरिकेत जाऊन इंटरनेट शिकायचा असा काही ध्यास घेतला की वयाच्या 32 व्या वर्षी स्वतःच्या देशाची माहिती असणारी पहिली वेबसाईट तयार केली. आज जगात 240 देशात त्याने आपली 'अलिबाबा' ही कंपनी सुरू केली.हे इंटरनेटचे,व्यापाराचे साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे जॅक मा*
आज जे इंटरनेट वापरतात त्यांच्यासाठी 'गुगल 'इतकाच 'अलिबाबा' हा शब्द परवलीचा झाला आहे.जॅक मा याने आपल्या कंपनी चे नाव 'अलिबाबा' ठेवले कारण येथे कुणीही यावे आणि सर्च करून खजिन्यासारखे जे पाहिजे ते घेऊन जावे ही त्याची संकल्पना अफाट लोकप्रिय झाली.
*17 मित्रांना बरोबर घेऊन 43 लाख रुपये कर्ज काढून सुरू केलेल्या कंपनीची आजची संपत्ती420 अरब डॉलर आहे.चीन सारख्या पाश्चिमात्य विचारांचा पगडा असणाऱ्या देशात दोन दशका पूर्वी हे सारे धाडस करणे सोपे नव्हते .जॅक मा यांनी ते केले. जॅक मा म्हणतात विशीचे आयुष्य शिकण्यात,तिशी चाळीशीचे धोके पत्करण्यात ,आणि पन्नाशीचे आयुष्य जे चांगले काम केले आहे त्याचा आनंद घेण्यात घालवावे.वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अलिबाबा कंपनीतून निवृत्ती घेऊन परत शिक्षकी पेशा स्वीकारला आहे. व्यवसाय करताना जॅक मा यांनी हेच दाखवून दिले की जगाची गरज काय आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे.जिकडे कुणी फिरकत नाही अशा वाटा तुम्ही निवडल्या तर मग मिळणारे यश अफाट असेल*.

Comments
Post a Comment