गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग ३
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-3*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*पुणे जिल्ह्यातील एक कुटूंब पोटासाठी बँगलोर शहर गाठते.घरची परिस्थिती बेताचीच. आई गृहिणी, वडील हवालदार. जेमतेम पगारात खर्चाचे तोंडाला तोंड मिळत असे.अशावेळी तीन भावंडा नंतर त्याचा जन्म होतो .कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना, कठिण परिस्थितीत त्याची आई जिजाबाई त्याला कायमची सोडून जाते. सगळे संपले असेच त्याला वाटते,तो कोलमडून पडलेला असतानाही वडील रामोजीराव व भावंडांसाठी जिद्दीने उभा राहतो.म्हैसूर मिल मध्ये काम करताना प्रसंगी तांदळाच्या गोण्या उचलतो.बँगलोर परिवहन सेवेत कंडक्टर म्हणून काम करतो. हा तरुण म्हणजेच प्रचंड मेहनतीने भारतीय चित्रपट सृष्टीत अफाट,अचाट असे कर्तृत्व गाजवणारा शिवाजी गायकवाड ऊर्फ रजनीकांत होय*
बालचंदर नावाचे दिग्दर्शक शिवाजीला पहातात. त्याची तिकीटाचे पैसे देण्याची नजाकत,लकब, विद्युतलतेसारखी चपळता त्यांना मोहून टाकते. त्यांचे ठरते आपल्या पुढिल चित्रपटात नायक हाच असेल ते त्याला आपल्या चित्रपटात पहिली संधी देतात. तो त्या संधीचे सोने करतो .मग मात्र तो मागे वळून पहात नाही. त्याच्या चित्रपटांवर लोकांच्या उड्या पडू लागतात. बाहेर हाऊसफुल्ल चे बोर्ड झळकू लागतात.त्याची एक झलक बघायला लाखोंची गर्दी जमू लागते.लोकांच्या गळ्यातील तो ताईत बनतो.आणि बघता बघता शिवाजी गायकवाड *रजनीकांत* बनतो. *थैलवा,रजनी,बॉस,सुपरस्टार* ही त्याची आणखी काही नावे. तो म्हणजे अभिनय क्षेत्रातील जणू काही एक अनभिषिक्त सम्राटच.
*मद्रास येथे अभिनयाचे धडे घेऊन त्यांनी केलेल्या या अफाट मेहनतीचे फळ म्हणून त्यांना पदमभूषण,पदमविभूषण,जर्मनीचा द फ्युरिअर हा सर्वोच्च नागरी सन्मान,अनेक वेळा उत्कृष्ट अभिनेता सन्मान ,तब्बल 10 वेळा फ्लिमफेअर पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा राज कपूर पुरस्कार,यासारखे अनेक पुरस्कार मिळाले .या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांना मिळालेला भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके हा पुरस्कार.*
*रजनीकांत यांचे यश पाहिल्यावर एक गोष्ट जाणवते अफाट कष्ट करा.जगण्यासाठी जो संघर्ष करायचा आहे तो सतत करण्याची तयारी ठेवा.जगात कोणतीच व्यक्ती लगेच मोठी होत नाही सूर्य सुद्धा हळूहळू मोठा होतो.शेवटी काय तर यश मिळवण्याची इच्छा हृदयातून डोक्यात गेली पाहिजे आणि ती नसानसात भिनली पाहिजे.*

Comments
Post a Comment