गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- २४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-24*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील सिएटल येथे त्याचा जन्म 28 ऑक्टोबर 1955मध्ये झाला.शाळेत शिकवत असलेल्या विषयात त्याचे फारसे मन रमत नव्हते.पण गणित आणि विज्ञान हे त्याचे आवडीचे विषय.शाळेत आणि कॉलेजमध्ये तो तासनतास संगणक खोलीत काहीतरी करत बसायचा .बँकिंग मध्ये असणाऱ्या आईला त्याने त्यात करिअर करावे असे वाटे. वकिल असणाऱ्या वडिलांना तो मोठा वकिल व्हावे असे वाटे.पण त्याला या सगळ्यात काडीचा रस नव्हता.तो मुलगा लहान वयातच कंपनी स्थापन करतो.पुढे ती कंपनी जगातील संगणक प्रणाली तयार करणारी प्रथम क्रमांक ची कंपनी बनते.त्यात सुमारे 24000 हजार पेक्षा अधिक कामगार काम करू लागतात.आणि तो मुलगा सलग 11वर्षे जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनतो.ती कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट.आणि ती कंपनी स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे बिल गेट्स.मायक्रोसॉफ्ट च्या जागतिक साम्राज्याचा एक अनभिषिक्त सम्राट*
बिल आणि त्याचा कंपनी भागीदार पॉल ॲलन यांच्या डोक्यात अफलातून कल्पना येत असे .आय. बी. एम कोम्पॅक,डेल, डी. ई.सी या संगणक कंपन्याचे असे म्हणणे होते की हार्डवेअर ला अधिक महत्त्व द्यावे पण बिल चे म्हणणे असे होते की सॉफ्टवेअर अधिक महत्त्वाचे आहे.हीच नस ओळखून बिलची कंपनी आगळीवेगळी ठरली.गेट्स या संगणक युगात आले आणि सारे काही त्यांनी बदलून टाकले. ग्राहक प्रथम स्थानी मानून त्यांनीआपली अनेक सॉफ्टवेअर तयार केली.आज जगात जेवढे डेस्क टॉप संगणक वापरले जातात त्यात 80 टक्के विंडो सॉफ्टवेअर वापरले जाते.याशिवाय जगभरात खाजगी संगणकात मा
यक्रोसॉफ्ट चे सॉफ्टवेअर वापरले जाते. *
*बिल गेट्स त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे.बिल गेट्स व मेंडीला गेट्स फाउंडेशन आपल्या मिळणाऱ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा दरवर्षी गोरगरिबांना दान करते.त्यांच्या याच कार्यामुळे भारत सरकारच पद्मभूषण सन्मान त्यांना मिळाला आहे.याशिवाय बोवेर अवार्ड,जेफर्सन अवार्ड ही त्यांना मिळाले आहे.जेवणानंतर स्वतःचे ताट स्वतः धुणाऱ्या या जगातील सर्वात श्रीमंत अवलीयाने microsoft, microsoft excel यासारखी नवनवी तंत्रे शोधून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगतमान्यता मिळवली.बिल गेट्स आपल्याला जणू हेच सांगत राहतात सतत नाविन्याचा ध्यास घ्या.एक कल्पना यशस्वी झाली तर त्या यशात दंग न होता पुढे जात रहा.कारण थांबते ते डबके ,आणि वाहतो तो झरा.म्हणून आपल्या स्वप्नांना कल्पनांना सतत प्रवाही ठेवा*

Comments
Post a Comment