गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १२

*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-12*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
    8308677799
    8806150248


*त्याचा जन्म सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे 8 डिसेंबर 1993 मध्ये शेतकरी  कुटुंबात झाला.पहिलवान असणाऱ्या वडिलांना वाटे आपल्या मुलानेही पैलवानकी करावी.पण कुस्तीच्या खेळात  कानावर मारणे त्याला अजिबात आवडत नसे.त्यात त्याचे मनही रमत नव्हते. गावातील सरकारी शाळेत शिक्षण  घेत असताना त्याला कबड्डी खेळाची आवड लागली.वडिलांनी कुस्ती सोडून कबड्डी खेळायला परवानगी दिली.मग त्याचा खेळ असा काही बहरला की तो खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय कबड्डी संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला.तो  कबड्डी खेळाडू म्हणजे उत्तम चढाई पट्टू काशीलिंग अडके ऊर्फ काशी*

काशीलिंग चा खेळ पाहून भारतीय क्रिडा प्राधिकरण यांनी (SPORT AUTHERITY OF INDIA -SAI) त्याला गुजरात येथे प्रशिक्षण ला पाठवले .त्याचेच फळ म्हणून 2014 प्रो कबड्डी लीग मध्ये त्याची दिल्ली संघाकडून निवड झाली.यात 39 सामन्यात 302 गुण घेणारा आणि एका सामन्यात  चढाईत 24 गुण घेणारा एकमेव खेळाडू म्हणजे काशीलिंग. साऊथ एशियन गेम मध्येही त्याने आपल्या  कौशल्यपूर्ण ,चपळ खेळाचे दर्शन घडवले.भारत पेट्रोलियम, महिंद्रा यासारख्या नावाजलेल्या संघाकडून काशीलिंग ने उत्कृष्ट खेळ केला आहे.त्याचे  सुरुवातीचे प्रशिक्षक ज्ञानदेव पाटील सर ,चुलते सुनील अडके यांचा या यशात मोठा वाटा आहे हे सांगायला ही काशी विसरत नाही.

*तो 20 वर्षाचा असताना वडील वारले.कबड्डी जवळपास सुटलीच होती.कुटुंब चालावे म्हणून तेव्हा केवळ 50 रुपये रोजावर साखर कारखान्यात मजूर म्हणून काम करणारा  मुलगा पुन्हा न खचता उभा राहतो.पुढे भारतीय कबड्डी संघात नावाजलेला खेळाडू बनतो. आणि आपल्याला जणू हेच सांगत राहतो आज तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे महत्त्वाचे नाही.तुम्ही ती बदलण्यासाठी काय मेहनत घेतली,किती यातना सहन केल्या,त्या परिस्थितीतून कसे जिद्दीने बाहेर पडलात हे अधिक महत्त्वाचे आहे*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०