गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-२१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-21*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*युगोस्लोवीया देशातील स्कोपे शहरात तिचा जन्म झाला.वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले.आईने तिचे पालनपोषण केले.वयाच्या 12 व्या वर्षी त्या मुलीने निश्चय केला आपल्याला जोगीन अर्थात नन व्हायचे.ज्या वयात मुलांचे भावविश्व शाळा,खेळणे, असे असते त्याच वयात या मुलीने आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित केला.वयाच्या 18 व्या वर्षी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर लगेच सर्व सुखाचा त्याग करून जोगीणीचे व्रत तिने घेतले.ती भारतातील बंगालमध्ये कार्य करणाऱ्या लॉरेटो संघात तिने प्रवेश घेतला.येथूनच दिनदुबळ्याची सेवा करायचे त्यांनी ठरवले. यात त्यांनी इतके काम केले की जगाला त्यांची दखल घ्यावी लागली.असे समाजकार्य करणारी ती मुलगी म्हणजे आग्रेस गोन्शा बोजाहिव उर्फ मदर तेरेसा*
मदर तेरेसा यांचे कार्य भारतात मोती सरोवर येथे गरिबांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढून सुरू झाले.पण त्या कार्याचा विस्तार जगभर झाला. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना .रेमेन मॅगसेसे,जवाहरलाल नेहरू,युनोस्को शांतता,भारत शिरोमणी,भारतरत्न,यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले.या सर्वांवर कळस म्हणजे त्यांना मिळालेले *नोबेल पारितोषिक* त्यांच्या कार्याची महती सांगून जाते.
*मदर तेरेसा यांनी केलेले कार्य त्या पारितोषिकां पेक्षाही मोठे आहे.युगोस्लोवीयातून बाहेर पडताना जवळ फार थोडी रक्कम असणाऱ्या मदर यांना पुढे पैशाची कमतरता कधीच भासली नाही.गुन्हेगार मुलांसाठी शिशुभवन,पुरस्कार रकमेतून बांधलेले आग्र्याचे बालभवन,कुष्ठरोगी लोकांसाठी कलकत्ता येथे उभारलेले प्रेमनिवास, अशाच प्रकारे चालवली जाणारी 119 कुष्ठधाम केंद्रे.100 पेक्षा जास्त त्यांनी सुरू केलेल्या शाळा,त्यांच्या महान कार्याची साक्ष देतात. प्रेम ,उत्कट इच्छा,परिश्रम, देवावर नितांत श्रद्धा यामुळे त्यांच्या कार्याचा वटवृक्ष संपूर्ण जगभर पसरला. आपल्याला मिळालेले आयुष्य समाजासाठी जगताना मदर तेरेसा यांनी जगण्याचा नवा अध्याय निर्माण केला.तो असा स्वतःसाठी जगताना इतरांसाठी थोडे जगून पाहूया.मग पहा तो आनंद किती निर्भेळ आणि निरपेक्ष असेल.*

Chaitrali Bhagat
ReplyDeleteKhupach sangharshmay jivan jaglya madar teresa...! Naman karto tyanchy karyyala..... Kunal se kadam
ReplyDeleteJidda asel tar ashakya ,shakya hote, parantu _apar parishramachi garaj aste...! Kual s kadam
ReplyDelete