गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-19*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*अमेरिकेतील वायने कौंटी मीचीगण येथे अत्यंत गरीब कुटुंबात 30 जुलै 1863 मध्ये त्याचा जन्म झाला.सर्वजण शेतात राबत होते.पण संसाराचा गाडा पुढे ढकलत नव्हता . त्याचे सुरुवातीपासूनच शेतात मन रमत नव्हते. म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने घर सोडले.पुढे एका कारखान्यात यंत्र कामगार म्हणून नोकरी करू लागला.तेथे वाफेच्या इंजिनाची त्याला चांगली माहिती झाली.इल्यू मेटिंग कंपनीत मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्याने एक कार डिझाईन केली.अशाच खुप कार आपल्या स्वतःच्या कंपनीच्या बनल्या तर असा विचार त्याच्या मनात आला.आणि त्याने 1903 साली नोकरी सोडून देऊन अत्यंत कमी भांडवलात स्वतःची एक कंपनी सुरू केली.पुढे ती कंपनी संपूर्ण जगात प्रथम क्रमांकाची कार कंपनी बनली.ती कंपनी म्हणजे फोर्ड कंपनी व ती स्थापन करणारा  तो मुलगा म्हणजे हेन्री फोर्ड.* 


     त्या काळी माझी स्वतःची।कार कंपनी असेल या त्यांच्या ध्येयाला सर्वजण हसले होते.पण त्यांनी जिद्दीने लावलेल्या फोर्ड कंपनीचा पुढे वटवृक्ष झाला.फोर्ड यांच्या कारखान्याला क्रिस्टल राजवाडा म्हणत होते.त्या काळात 93 मिनिटाला एक कार तयार करणारी फोर्ड ही जगातील एकमेव कंपनी होती. कंपनीचे मॉडेल A, मॉडेल T, फोर्ड V8 कमालीचे लोकप्रिय ठरले.मॉडेल T च्या तब्बल दीड कोटी कार विकल्या गेल्या होत्या.त्यामुळे आजूबाजूला असणारे सारे स्पर्धक जमीनदोस्त झाले.जणू काही बालपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते.फोर्ड हे कायम उद्योग जगतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व राहिले.     

    

  *जगात अनेक लोक नावीन्य आणि कल्पनाशक्तीला आपल्या मुठीत घेतात.समाजासमोर आपले एक वेगळे अस्तित्व मागे ठेवून जातात. त्यांची हप्त्याने कार विकत देण्याची कल्पना अशीच अफलातून होती.हप्त्याची पद्धत आजही चालू आहे. फोर्ड नेहमी म्हणत असे'एखादे काम करायला तुम्ही लायकआहात किंवा नाही यापैकी काही असले तरी तुम्ही बरोबर आहात  कारण तुम्ही स्वतःला बरोबर ओळखले आहे.जबरदस्त इच्छाशक्ती व ध्येयपूर्ती यांचे एकत्रित मिश्रण झाले तर ध्येयाची अनेक शिखरे पादाक्रांत करता येतात हेच फोर्ड यांच्या संघर्षमय जीवनातून शिकायचे.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०