गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १५

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-15*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*शिक्षक असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1946 मध्ये झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा हे त्याचे जन्मगाव.बालपणीचे शिक्षण गावातील राममंदिरात झाले.कारण त्यावेळी गावात शाळेसाठी इमारत नव्हती.पुढे नागपूर येथे त्याने इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर तो त्रिवेंद्रम येथे इलेक्ट्रॉनिक रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर चा संचालक बनला.अमेरिकेने मा.पंतप्रधान राजीव गांधी यांना महासंगणक तंत्रज्ञान द्यायचे नाकारले तेव्हा याने भारतातच भारतीय महासंगणक बनवण्याचे आव्हान स्वीकारले.आणि   'परम'अर्थात 'सर्वोच्च' महासंगणक बनवून साऱ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली.असे अशक्य ते शक्य करून दाखवणारा तो मुलगा म्हणजे भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. विजय पांडुरंग भटकर*.


संशोधक, लेखक, शिक्षणतज्ञ अशी बहुआयामी ओळख असलेले व्यक्तीमत्व. 

भारताच्या संगणक क्रांतीचे शिल्पकार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 

आजवर  पद्म भूषण, पदमश्री,महाराष्ट्र भूषण,लोकमान्य टिळक यांसारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  सुमारे 37 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.स्वर्गीय राजीव गांधी यांनी डॉक्टरांना जेव्हा विचारले की आपण हा संगणक कधी आणि किती खर्चात बनवू शकतो.तेव्हा डॉक्टरांचे उत्तर होते'अमेरिकेपेक्षा कमी वेळात आणि कमी खर्चात'.संगणकाबद्दल काहिच माहिती नसताना हे दिलेले उत्तर त्यांच्यातील आत्मविश्वासाची प्रचिती देते.


*अमेरिकेचा संगणक क्रे यांनी विकसित केला होता.त्यानंतर हे यश फक्त भारताच्या वाट्याला आले.अमेरिकेपेक्षा कमी किंमतीत कमी वेळात,हाताळायला सोपा असा महासंगणक बनवून डॉक्टर व सहकारी मित्रांनी हे आव्हान लीलया पार पाडले. संगणकाची काहीही माहिती नसताना डॉक्टर यशस्वी झाले. केरळ मधील  इन्फोटेक पार्क व MKCL  च्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावरून एकच गोष्ट शिकायची नवीन आव्हाने पेलायला शिका. ती पूर्ण करायला शिका.त्यातून आपण अनुभव संपन्न होत जातो.यशस्वी होऊ अथवा नाही पण आत्मविश्वास ठेवून  कायम संघर्ष करत रहावे*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०