गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग-२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-2*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*तो सहा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.मग पोटासाठी एक मुलगा अतिशय गरीब परिस्थितीत गोवा येथून आई बरोबर मायानगरी मुंबईला येतो.गिरगावात चाळीत राहतो. मुंबई च्या पालिकेच्या शाळेत शिकतो .आयुष्यातील कमीत कमी 12 वर्षे अनवाणी चालतो.सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करतो .घर चालवण्यासाठी आईचे शिवणकाम ,इतर पडेल ते काम करणे पहातो, हे सगळे पाहून मनात खुप मोठे होण्याचा वणवा पेटतो. पुढे तो इतका मोठा होतो की पदमश्री, पदमभूषण,पदमविभूषण या भारतातील अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी तो सन्मानित होतो.तो मुलगा म्हणजेच भारताचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात जगाच्या नकाशावर नेणारे महान शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर*
माशेल या छोट्या गावातून येत परिस्थितीशी दोन हात करत ते शिकत राहिले.अकरावी बोर्ड परीक्षेत मेरिट मध्ये आले .शिक्षण अर्धवट रहाते असे वाटत असताना यावेळी टाटा ट्रस्ट ची स्कॉलरशिप मदतीला धावून आली पुढे बी .केम करताना रासायनिक अभियांत्रिकी पी एच डी मिळवली तीही वयाच्या 23 व्या वर्षी.डॉक्टर यांचा उल्लेख आला की आठवते ते त्यांनी अमेरिके सारख्या बलाढ्य देशाबरोबर दिलेला हळदीच्या स्वामित्व साठी(पेटंट ) दिलेला लढा .अमेरिका हळदीच्या पेटंट वर आपला हक्क सांगत होती पण यावेळी पुराण ग्रंथातील अनेक संदर्भ देत अभ्यास पूर्ण दावा करत हि लढाई भारताने जिंकली . त्या काळात भारतासारख्या विकसनशील देशाने अमेरिकेला आव्हान देने सोपी गोष्ट नव्हती .हाच प्रकार बासमती तांदळाचा त्याचे पेटंट ही त्यांनी परत मिळवले.औषधांपासून ते खतांपर्यंत डॉक्टरांनी देशाला मार्गदर्शन केले. त्यांनी पारंपारिक वैदयकशास्त्र, आधुनिक वैद्यक शास्त्र व आधुनिक विज्ञान यांचा जो संगम घडवला ते *चित्रकूट डिक्लेरेशेन* म्हणून प्रसिद्ध आहे.
*60 पेक्षा जास्त पुरस्कार,40 डॉक्टरेट,200 शोधनिबंध,20पुस्तके,30हून अधिक पेटंट,असे अचाट आणि अविश्वसनीय काम डॉक्टरांनी करून दाखवले. परदेशातील करोडो रुपयाची नोकरी लाथाडून हा माणूस 2100 रुपये महिना पगारावर भारताची सेवा करायला हसत हसत तयार होतो. ज्या पुस्तकात न्यूटन सारख्या महान शास्त्रज्ञाची सही आहे तेथे सहीचा मान मिळवणारी पहिली व्यक्ती म्हणजे डॉक्टर माशेलकर. डॉक्टरांनी यशाचा नव्याने अर्थ स्पष्ट केला,तो असा तुमचा सुद्धा विश्वास बसला पाहिजे की,आपल्या मध्ये सुद्धा काही अर्थ आहे.संधी उगवत्या सूर्याप्रमाणे असतात जास्त वेळ वाट पहात नाही .याच संधीचे मेहनतीने सोने केले की आपण यशस्वी होतोच होतो.*

Comments
Post a Comment