गोष्ट माझ्या आईची भाग ४१
*📝गोष्ट माझ्या आईची* *📝 .*अब्राहम लिंकन* 📔 *भाग - 41* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *माझ्या आईचे नाव होते नॅन्सी हॅस्क.माझा जन्म एका लाकडाच्या खोपटात जरी झाला असला तरी आईसाठी मी अनमोल होतो.माझे वडील थॉमस शेतकरी होते.अत्यंत गरीब कुटुंबात जन्म असूनही आईने प्रचंड मेहनत घेऊन माझे पालन पोषण केले.माझ्या आजोबांच्या नावावरून माझे नाव अब्राहम ठेवण्यात आले होते.आईने केलेला संघर्ष लहानणापासूनच मी पहात आलो होतो.माझ्या नशिबात पहिल्या आईचे प्रेम कमी आले.मी सात वर्षाचा असताना माझी आई मला सोडून गेली*. *नंतर माझ्या आयुष्यात आलेल्या सारा बुशा या सावत्र आईने मला खूप जीव लावला.ती स्वतंत्र विचारांची होती.मला ती नेहमी सांगायची आपल्याला जी गोष्ट पटत नाही तिला नकार द्यावा.प्रसंगी त्यासाठी स्पष्ट बोलावे.माणुस...