गोष्ट माझ्या आईची भाग ३९
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*माधव ज्युलियन*
📔 *भाग - 39*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझा जन्म बडोदा येथे झाला.माझे मामा सयाजीराव गायकवाड यांच्या बदोडा संस्थान मध्ये नोकरीला होते.आई तेथेच असल्यामुळे गुजरात मधील बडोदा हेच माझे जन्म ठिकाण.आई मी झाल्यावर बडोद्यालाच राहिली.त्यामुळे माझे शालेय,महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले.मी शिक्षित व्हावे हे तिचे स्वप्न कठोर मेहनत घेऊन मी पूर्ण केले*.
*महाविद्यालयात असताना आम्ही मुलांनी एक मंडळ स्थापन केले होते यात आम्ही एकमेकांना आपल्या कविता ऐकवत असे यावेळी माझ्या आईवरील कविता अधिक असत.याच भावनेतून मी ज्या मुलाला आई लहानपणीच सोडून जाते त्या मुलासाठी"प्रेम स्वरूप आई,वात्सल्य सिंधू आई,बोलावू तुज आता मी कोणत्या उपाई" ही अजरामर कविता लिहली*.
*माझ्यावर आईने जे सत्याचे संस्कार केले ते मी आयुष्यभर प्राणपणाने जपले.इतरांना त्रास होणार नाही असे वागावे.नाही चांगले करता आले तरी चालेल पण वाईट कुणाचे करू नये.ही साधी पण जगण्याचा आधार असणारी शिकवण तिने कृतीतून दिली.पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षक म्हणून काम करताना हे सगळे आईच्या श्रमाचे फळ आहे हे मला पदोपदी जाणवत असे.म्हणूनच मी लिहले होते त्याच आईच्या पोटी माझा फिरून परत जन्म व्हावा*.
*ओठावर आई शब्द आला की श्रावण ऋतू फिरून आला आहे असे वाटले.आई मुलांसाठी श्रावणातल्या सरी होते ,तशी तिच्यात वैशाखातील वणवा होण्याचीही ताकद असते*.
Comments
Post a Comment