गोष्ट माझ्या आईची भाग 35

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*संदीप पाटील माजी भारतीय फलंदाज*          

  📔       *भाग - 35*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*आई जशी प्रेम करणारी हवी तशी ती कठोर शासन करणारीही हवी.अशी आई असेल तरच संदीप पाटील घडू शकतात.कौतुक,प्रेम,आनंद, प्रेरणा याचबरोबर कठोर शिस्त देखील महत्वाची असते याचे भान आईने कायम राखले.म्हणूनच मी माझ्या वडिलांचा क्रिकेटचा वारसा पुढे चालवू शकलो*.


*माझी आई स्वतः उत्तम बॅडमिंटनपटू होती.भारताच्या राष्ट्रीय संघात आई खेळली होती.त्यामुळे तिने मला फक्त हौशी  क्रिकेटपटू केले नाही.म्हणूनच मी भारतीय संघात स्थान मिळवू शकलो.चांगली बॅट,बॉल आणि तासनतास क्रिकेट खेळणे इतकेच  महत्वाचे नसते तर मजबूत शरीरयष्टी,दणकट स्नायू,यांची क्रिकेटसाठी गरज असते हे आईला पक्के ठावूक होते*.


*सकाळीं लवकर उठणे,सायकलिंग करणे,पोहणे  हे करताना अभ्यास करणे हे सगळे माझ्याकडुन ती करून घेत असे.मी क्रिकेट खेळताना माझ्या खेळाकडे ती बारकाईने लक्ष ठेवत असे.मला कोणी बॉलिंग टाकायला नसले तर आई बॉलिंग करत असे. तिला चांगली स्पिन बॉलिंग येत होती*.


*कितीही चांगला खेळ केला तरी तुझ्या उत्तम खेळासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल असे ती कायम सांगत असे.मी दौऱ्यावर जात असे तेंव्हा आई मला विमानतळावर सोडवायला येत असे.याचे बाकी खेळाडूंना खूप अप्रूप वाटत असे.आईने आणखी एक शिकवण अशी दिली की आनंदासाठी खेळ,स्वार्थासाठी न खेळता संघासाठी खेळ.ती शिकवण मी सदैव आचरणात आणली*.


*आपले आयुष्य संपत आले असे आईला कळल्यावर ती आळंदीला जावून येते असे म्हणतात नाही प्रत्यक्ष गेली तरी मनाने जात असेल का ती हा प्रश्न कायम सतावतो मनात.मी गेल्यावर माझ्या लेकराची काळजी घे असेच तर सांगत नसेल ना आई आळंदीला जावून साऱ्या जगाच्या माऊलीला*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०