गोष्ट माझ्या आईची भाग ३७
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*सोपानदेव चौधरी बहिणाबाई यांचे सुपुत्र,लेखक कवी*
📔 *भाग - 37*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते बहिणाबाई.मी विद्यार्थी दशेत असताना माझा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला याचे सारे श्रेय आईचेच कारण कवितेचे बाळकडू मला घरातूनच मिळाले होते. माझ्या आईने ज्या गोड ओव्या लिहल्या होत्या त्यातूनच मला काव्य स्फूर्ती मिळाली होती*.
*आईला काव्याचे देणे अंगचे होते.कोणतीही ओळ लिहाताना तिला कधीच शब्दांची कमतरता भासली नाही.ती व्यवहारात जरी कधी कुणाशी बोलत असली तरी ते अर्थपूर्ण असे,मार्मिक असे*.
*दर उन्हाळ्यात ती हवा पालट म्हणून नाशिकला येत असे यावेळी ती खेड्यातील महिलांशी एकरूप होत असे त्यांचे निरीक्षण करत असे यातूनच तिची कविता जन्माला यायची आणि ती अस्सल कविता बनायची*.
*आई कायम सांगायची महिला कामात इतक्या गुंतलेल्या असतात की त्यांना स्वतःकडे पहायलाही वेळ मिळत नाही.त्यांना वेळ असता तर त्यांनी अशक्य वाटणाऱ्या चिंचेच्या पानाचीही पत्रावळी बनवून त्यात जेवण केले*.
*ती आजारी असल्यावर मी भेटल्यावर तिला बरे वाटायचे मग ती म्हणायची तू माझे औषध आहे.तिचे सहज बोलणेही मोठमोठ्या विद्वानांना चकित करत असे.माझी आई एक व्यक्ती नसून देवाचे अस्तित्व पटवून देणारे दैवत होती*.
*संसार करताना आईला सगळे समजते.हातावरील मेहंदी इतरांना पहायला सुंदर वाटत असली तरी ,मेंहदीच्या वळणाच्या रेषेत काय उणीवा आहे जसे तिला नेमके समजते,तशाच संसारातील उणीवा ती शोधते आणि त्या सोडवत राहते आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता*
Comments
Post a Comment