गोष्ट माझ्या आई़ची भाग ३८
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*उज्वला पाटील शिडाच्या नौकेने विश्वपरिक्रमा करणारी पहिली महिला*
📔 *भाग - 38*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*.माझ्या आईचे नाव होते सरस्वती.तिची शिकायची खूप इच्छा होती पण प्रापंचिक व्यापामुळे ते शक्य झाले नाही.तरीही तिने चौथी पर्यंत शिक्षण घेतले होते.मला शिकता आले नाही तरी चालेल पण,माझ्या मुली शिकल्या पाहिजे हा तिचा आग्रह होता.याच जिद्दीतून तिने माझ्या बहिणीला त्या काळात डॉक्टर केले,शिवाय लंडनला शिकायला पाठवले*.
*आमच्या दोनशे एकर शेतीमध्ये कधी कधी शंभर शंभर माणसे कामाला असायची.त्यांना जेवण घरी बनवायला लागायचे.अशावेळी घरात असणाऱ्या सात चुलीवर आम्ही सात बहिणी वीस वीस भाकरी करत असे.स्वयंपाक करताना स्वच्छ्ता आणि नीटनेटके याचा संस्कार आईमुळेच आमच्यावर झाला*.
*कोणत्याही कामाचा कंटाळा नसावा सगळी कामे आली पाहिजे हा आईचा कटाक्ष असायचा.तू जे करशील ते चांगले करशील अशी श्रद्धा ती बाळगून होती.मी रायफल शूटिंग सुरू केले,शिडाच्या नौकेतून विश्वपरिक्रमा करायचे ठरवले तेव्हा आईनेच मला पाठिंबा दिला*.
*परिक्रमा करताना तांबड्या समुद्रात जेव्हा आमची नौका बुडाली तेव्हा जीवन रक्षक ताफ्यावर मी सहा दिवस काढले तेव्हा सर्वांनी मी जिवंत असण्याची आशा सोडली होती. आईने मात्र ही आशा सोडली नव्हती.मी.सुखरूप घरी आल्यावर "तू वादळापुढे हार मानणार नाही याची मला खात्री होती" असे आई म्हणाली."कुणाच्याही घरी तीन दिवसापेक्षा पाहुणा राहू नये म्हणजे किंमत राहते"तिने केलेला हा संस्कार मी कायम पाळला*.
*आई आणि माती सारखीच दोघींच्याही तळाशी लाव्हारस असतो.त्यांना जीव लावावा लागतो.मनाची मशागत करावी लागते त्यांच्या.नाहीतर एकदा का ओल संपली की फुपाटा उडू लागतो मग तो शेतातील असो व संसारातील*.
Comments
Post a Comment