गोष्ट माझ्या आईची भाग ३६

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*डॉ.विजय खोले माजी कुलगुरू*         

  📔       *भाग - 36*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते वसुंधरा.माझे वडील राज्य शासनाच्या कृषी विभागात कामाला होते.आई त्या काळात अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढलेली असतानाही तिने कोणतीही कुरकुर न करता बाबांबरोबर यशस्वी संसार केला.माझे सारे शिक्षण पुण्यात झाले.त्या काळी नूतन मराठी विद्यालय प्रसिद्ध होते.येथे प्रवेश घेण्याचा निर्णय हा आईचाच होता.*


*मी रात्री अभ्यास करत असताना आई माझ्या बरोबर जागत असे आणि मला कंटाळा आला की चहा बनवून देत असे.शिक्षण संपल्यावर नोकरी करावी,घर सांभाळावे अशी एकंदर परिस्थिती होती.मी नोकरी न करता आईकडून संशोधन करण्याची परवानगी मागितली.आईने याला पाठिंबा दिला*.


*मी हुशार असलो तरी मला शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय ते शक्य नव्हते. शेवटी रशियाची शिष्यवृत्ती मिळाली.यावेळी बाबांनी त्यांच्या फंडाचे पैसे मला रशियाला जाण्यासाठी दिले.मी इतका मोठा झालो,शिकलो,अनेक मान सन्मान मिळाले यात आई वडिलांचा वाटा खूप मोठा होता.आईने मला व्यायामाची आणि पोहण्याची सवय लावली.तिच्या खंबीर पाठिंबा हेच माझ्या यशाचे गमक होते.*


*बाई आई  झाल्यापासून जोडत असते ठिपके ठिपके संसाराचे.जोपर्यंत नाही होत तिच्या मनासारखी नक्षी तयार तोपर्यंत जोडत असते ती ठिपके. ते ठिपके कशाचे आहे नाहीच कळत पुरुषाला शेवटपर्यंत*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०