गोष्ट माझ्या आईची भाग ३२
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 .*उदय देशपांडे प्रसिद्ध मलखांबपटू*
📔 *भाग - 32*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते शैलेजा.आम्ही मूळचे कर्नाटक राज्यातील खानापूरचे राहणारे.अभ्यास करण्याबरोबरच आपल्या मुलाने शरीर साधनाही केली पाहिजे या मताची आई होती.माझे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते.मी समर्थ व्यायाम मंदिरात जायचो व माझी व्यायामसाधना होत पर्यंत माझी आई शिवाजी पार्क मध्ये माझी वाट पहात बसायची.वडीलांमुळे मला व्यायामाची आवड लागली खरी पण आईने ती पुढे जोपासली*.
*माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी काळजी घेणारी व मला अडचणीत वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणारी आईच होती.म्हणूनच मी मल्लखांब देश विदेशात पोहचवू शकलो.अनेक देशात त्याची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.लाकडी मल्लखांबाप्रमाने दोरीवरील मल्लखांब जगभर घेऊन जाता आला*.
*माझ्या आईचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता.तिने माझ्या मनात स्री पुरुष असा भेद होईल असे संस्कार कधीही केले नाही.किंवा होवू दिले नाही.म्हणूनच फक्त पुरुषांनाच नाही तर मुलींचाही मल्लखांब खेळ मी देशविदेशात नेला.याचे सारे श्रेय मी माझ्या आईला देतो*.
*एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याच्या त्या परिस्थितीवर कधीच हसू नये.त्या व्यक्तीला आपल्या परीने जमेल तितकी मदत करावी हेच संस्कार ती कायम करत आली*.
*स्वतःचे दुःख कधीच बाहेर फुटू देत नाही आई.वरून नेहमी प्रसन्न राहून मुलांचा निवारा होते आई.तिला माहित असते ब्रह्मज्ञान,ती ओळखते लेकरांच्या मनाचा ओलावा आणि कोरडेपणाही*.
Comments
Post a Comment