गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०४
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* *📝भाग -104* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 26 डिसेंबर1914 रोजी झाला.घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे तो वकीलीचे शिक्षण पूर्ण करतो.महात्मा गांधीजींच्या कार्याने प्रेरित होऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वंचित,असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तो काम सुरू करतो.हे करताना एका पावसाळयात कान,नाक, झडून गेलेला,जखमांनी विव्हळणारा,गटाराच्या कडेला पडलेला एक महारोगी त्याच्या दृष्टीत पडतो.त्याचे मन गलबलून जाते,मनातील करुणा जागृत होते.मग तो तरुण सर्व आयुष्य महारोग्यांच्या सेवेसाठी पणाला लावण्याचे ठरवतो. स्वतः दीपस्तंभ बनून दुःखी लोकांच्या जीवनात आनंदाचा आणि सौख्याचा प्रकाश निर्माण करतो.असा प्रकाश निर्माण करणारा,अनेक अंधारल्या जीवांना जगण्याची नवी उमेद देणारा तो मुलगा म्हणजे शतकातील महान समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे*. *बाबा आमटे यांनी केलेल्या कुष्ठरोग्यांच्या सेवेबद्दल त्यांच्याकडे अनेक पुरस्कार घनदाट अरण्याच्य...