गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०३
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*
*📝भाग -3-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म पश्चिम बंगाल मधील कलकत्ता येथे 2 मे1921 मध्ये झाला.बालकथा लिहिणारे आजोबा,चित्रकार असणारे वडील सुकुमार राय,गायिका असणारी आई सुपर्णा राय यांचा सहवास त्याला लहानपणीच लाभला.साहित्य,संगीत, कला यांचा वारसा घरातूनच मिळालेला हा मुलगा रसायनशास्त्र,जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांचा पदवी पर्यंत अभ्यास करतो.पण यात त्याचे मन रमत नाही.पुढे रवींद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतन मध्ये तीन वर्ष चित्रकला तो शिकतो.त्याची मनातील चित्रपटाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही यातच तो स्वतःला झोकून देतो मग पुढे तो मुलगा विश्वातील उत्तम कला निर्देशक,कथा लेखक,संगीतकार,चित्रपट निर्माता,बाल साहित्यिक,चित्रकार बनतो.तो मुलगा म्हणजे जगातील महान चित्रपट निर्माते सत्यजित रे उर्फ माणिकदा*.
*सत्यजित रे यांनी चित्रपट सृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न,दादासाहेब फाळके यासारखे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. चार्ली चॅप्लिन नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने डॉक्टररेट प्रदान केलेली व्यक्ती म्हणजे सत्यजित रे.त्यावेळच्या फ्रान्स च्या राष्ट्रपतींनी कलकत्ता येथे येवून त्यांना सिज ऑफ आचर हा फ्रान्स चा सर्वोच्च किताब दिला.हॉलीवूडचा विशेष ऑक्सर,मॅगसेसे अवॉर्ड,यासारखे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले*.
*पथेर पांचाली चित्रपटाची कथा रे यांच्याकडून बोटीवर प्रवास दरम्यान लिहिली गेली.या चित्रपटाचा विश्वातील महान चित्रपट,मानवीय दस्तऐवज म्हणून गौरव झाला.13 पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.अपराजिता,तीन कन्या,चारुलता,नायक, शतरंज के खिलाडी असे 36 पेक्षा अधिक दर्जेदार चित्रपट त्यांनी बनवले.समाजाची पिढीजात दुःख, वंचित शोषित यांच्या वेदना,पाखंडी समाजाचा पोकळपणा,स्री पात्राचे आदर्श दर्शन,प्रेक्षकांच्या मन,बुद्धीला गदागदा हलवणारे लेखन ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये होती. भारतीय सिनेमाला वैश्र्विक उंची प्राप्त करून देणारे रे यांनी चित्रपट निर्मिती करताना कधीच सुरक्षित मार्ग स्वीकारला नाही.लहानपणी वडिलांचे छत्र हरपले तरी ते खचले नाहीत.जे अशक्य ते त्यांना करायला आवडत असे.त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगते जीवनाचा कोणताही टप्पा तुम्ही आता जगत असाल तरीही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात मन रमावा,त्यात समाधान शोधा.मग त्या समाधानातून मिळणारा आनंद निर्भेळ असेल*.

Comments
Post a Comment