गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०२


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* 

*📝भाग -2-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*तिचा जन्म एका शेतकरी कुटुंबात उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ मधील बहादुरपूर गावात 28 ऑगस्ट 1992 रोजी झाला.घरात पाच भावंडे.घरची परिस्थिती जेमतेम,यात ती घरात वयाने सर्वात लहान.शाळकरी वयातच तिने भालाफेक मध्ये हात आजमावायला सुरुवात केली होती.पण भाला घेण्यासाठी पुरेसे पैसेही तिच्याकडे नव्हते.तिला काही वेळा हा खेळ सोडावा हा विचारही मनात आला पण तिने हार मानली नाही. तिने ऊसाचे,बांबूचे भाले बनवले आणि त्यावर सराव करू  लागली.ऊसाच्या भाल्यापासून सराव करणारी मुलगी  एक दिवस ऑलिम्पिक,राष्ट्रकुल,आणि आशियायी स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करेल असे कुणाच्या ध्यानीमनीही नसेल.पण संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवले हे सोनेरी यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे भालाफेकपटू अन्नू राणी धारायन ऊर्फ जॅव्हलिन क्विन*.


*अन्नुचे नाव पहिल्यांदा 2014 च्या आशियाई स्पर्धेत चमकले.यात तिने कांस्यपदक जिंकले .2015 व 2017 साली अशियाई स्पर्धेतही तिने अनुक्रमे कांस्यपदक,रौप्यपदक जिंकले.राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक,जिंकत आपल्या यशाचा आलेख सतत चढता ठेवला.स्वतःचेच अनेक राष्ट्रीय विक्रम मोडत ती अनेक वेळा विजेती ठरली*.


*मोठा भाऊ उपेंद्रकुमार तिचा भक्कम पाठीराखा झाला आणि अन्नू राणी भालाफेक खेळात चमकली.पहाटे चार वाजता उठून धावपटू असणाऱ्या भावाबरोबर  सराव करणारी अन्नू गुरुकुल प्रभात आश्रमाच्या मैदानात भालफेकीचा तासनतास सराव करायची.कुटुंबाची परिस्थिती घरातून दोन खेळाडूंचा खर्च उचलेल अशी नव्हती म्हणून बहिणीसाठी आपला खेळ सोडणारा भाऊ उपेंद्रचा त्याग खूप मोठा आहे. सुरुवातीला लोकवर्गणीतून खेळाचे बूट खरेदी करून भालाफेकीचा सराव  करणारी आणि यश शिखरावर पोहचलेली अन्नू राणी आपल्याला जणू  हेच सांगत राहते तुमच्या जीवनात परिस्थितीची कारणे सांगत दुबळे बनू नका.मेहनतीने कितीही कठीण परिस्थतीतून यशाचा मार्ग मोकळा होतो*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०