गोष्ट माझ्या आईची भाग-२०

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 .*रवींद्र साठे - विख्यात गायक*           

  📔       *भाग - 20*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचा जन्म सोलापूर मध्ये झाला.तिचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते.माझ्या आईचे नाव शकुंतला होते.माझ्या आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि तेवढाच करारी होता.पानशेत धरण फुटून आमचा वाडा त्यात  भुईसपाट झाला.तरीही आई खचली नाही तिने घर तर बांधलेच पण घर, प्रपंच, पै पाहुणे हे सारे ती सांभाळत असे*.


*तिच्या कार्यतत्परतेेचा आमच्यावर नकळत संस्कार झाला.माझ्या वडिलांना गाणे,हार्मोनियम येत होते.मी अभ्यासात फार चमकत नसलो तरी मनात आणि ओठात गाणेच होते.आई वडिलांनी ते जाणले आणि मला त्यासाठी प्रेरणा दिली.माझे गायन लोकप्रिय होऊ लागले तेव्हा तिला खूप बरे वाटायचे. कोणत्याही क्षेत्रात जा,पण तिथे कर्तबगारी दाखवा,हा संस्कार तिने कृतीतून केला आणि तो मी आत्मसात केला*.


*गायन करताना मला त्याचा खूप फायदा झाला.दीडशे पेक्षा अधिक चित्रपटात गायन,275 पेक्षा अधिक कॅसेट,उत्तम पार्श्वगायकाचा महाराष्ट्र शासनाचा सहा वेळा पुरस्कार,भारतातील अनेक भाषात गायन हे सगळे यश मिळाले ते आईमुळे कारण" तुला जे आवडते ते कर हेच ती कायम सांगत आली"*.*माझे हे सारे यश पाहिले की तिला खूप आनंद होत असे*.


*ओठावर आई शब्द लिहला जातो मूल जन्मते तेव्हा,तेव्हापासून ती जगत असते त्याच्यासाठी निवारा बनून कितीही बरसला पाऊस  तरी पाऊस नाही लागू देत लेकराला*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४