गोष्ट माझ्या आईची भाग - 2
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 उद्योगपती जे.आर डी.टाटा.*
📔 *भाग - 2*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते सूनी.ती फ्रेंच होती.मी बराच काळ लहानपणी विदेशात घालवला आणि त्यानंतर माझ्या वडिलांचे उद्योग साम्राज्य सांभाळण्यासाठी मुंबईत आलो.माझ्या आईने खऱ्या अर्थाने माझे आयुष्य समृद्ध केले.ती मला सांगत असे* *आयुष्यात काही भव्य व्हायचे असेल तर स्वतःला फारसे महत्त्व देवू नकोस त्यापेक्षा टीमवर्कला जास्त महत्त्व दे.कोणाकडून सांगून काम करून घेण्यापेक्षा त्याला स्वातंत्र्य देवून त्याच्याकडून काम करून घेण्याची कला आत्मसात करून घे.आपल्या यशा इतकाच दुसऱ्याच्या यशाचा आनंद घे.क्षणिक लाभापेक्षा मानवी संबंधांना व ते जपण्याला महत्त्व दे.या साऱ्या गोष्टी तिने कधी मला* *आरशासमोर बसून सांगितल्या नाहीत,परंतु रोजच्या जीवनात जसे प्रसंग घडत जातील तशा त्या तिने माझ्या मनावर कधी सांगून तर कृतीने बिंबवल्या.*
*या जगात स्वप्न पाहणारे खुप असतात,पण ती सर्व शक्ती एकवटून सत्यात आणणारे खूप थोडे असतात हे सांगणारी माझी आईच होती.नुसती स्वप्न पाहून भागत नाही तर ती साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते हेही तिनेच मला सांगितले. अडचणीत असणाऱ्याला कोणालाही शक्य तितकी मदत करावी. खेळात हरले तरी जिंकण्यापेक्षा स्पर्धेचा खिलाडूपणाचाही आनंदही लुटता येतो हे तिनेच मला शिकवले.*
*आपल्या बरोबर असणारे सहकारी यांना सांगकामे न करता, कर्तृत्वशील बनवावे असे ती मला नेहमी सांगत असे. याचा कित्ता मी आयुष्य भर गिरवला.इतक्या मोठ्या उद्योग समूहात मी अनेक नव्या उद्योगांचा प्रारंभ करून ते यशस्वी केले त्यामागे आईचीच प्रेरणा होती.*
*जे.आर.डी टाटांचे आईने आयुष्य घडवले.आई मध्ये असामान्य शक्ती असते.ती कधीच सामान्य नसते.मुलांसाठी जगातील सर्व संकटांशी लढणारी एकमेव योद्धा म्हणजे आई.*
Comments
Post a Comment