गोष्ट माझ्या आईची भाग -१७
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 शेरपा तेनसिंग गिर्यारोहक .*
📔 *भाग - १७*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती अतबोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझा जन्म पूर्व नेपाळ मधील एका छोट्याशा खेड्यात झाला.माझी आई नेपाळ मधील पवित्र तीर्थस्थळाची यात्रा करीत असताना माझा जन्म झाला हे विशेष. नामग्याड वांगडी हे माझे पाळण्यातील नाव.पण आईला धर्मगुरूंनी सांगितले म्हणून तीने माझे नाव बदलून तेनसिंग नोर्गे ठेवले.नोर्गे म्हणजे सुदैवी*.
*मी जेव्हा तरुण झालो तेव्हा इतर मित्रांप्रमाणे मी सुध्दा हमाली करत होतो.मी पर्यटकांची हमाली करण्यापेक्षा हिमालयातील शिखरे पादाक्रांत करणाऱ्या विदेशी पर्यटकांची ओझी उचलायला सुरुवात केली.एक दिवस मनात विचार आला किती दिवस ओझी उचलायची.मग ठरवले आपणही हिमालयातील शिखरे पादाक्रांत करायची.लोकांना शिखर चढण्यासाठी गाईड म्हणून काम करताना माझ्या वेगळ्या कामाची इतकी प्रसिद्धी झाली की एवरेस्ट शिखर सर करायचे म्हटले की माझे नाव येत असे*.
*माझ्या तेरा मोहिमा अयशस्वी झाल्या पण मी खचलो नाही.कारण आई नेहमी सांगायची आपण शेर्पा आहोत,कोणत्याही परिस्थितीत जिद्द न हारता प्रयत्न करीत राहणे हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहे.तुला जे जमेल ते वेगळे कर याच जिद्दितून एडमंड हिलरी यांच्याबरोबर ची माझी एवरेस्ट मोहीम यशस्वी झाली.ती आईने केलेल्या संस्कारामुळे. शेरपा तेंनसिंग यांनी एवरेस्ट शिखर सर करताना आईच्या संस्काराची उंचीही हिमालया इतकी वाढवली हेही तितकेच सत्य आहे*.
*प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी सुंदर असते तर वडील रुबाबदार असतात.आई व्याकुळतेने थांग घेत राहते लेकरांच्या मनाचा तळ लागत पर्यंत*.
Comments
Post a Comment