गोष्ट माझ्या आईची भाग २८

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 सई परांजपे- प्रसिद्ध अभिनेत्री,लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका .*            

  📔       *भाग - 28*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते शकुंतला.ती प्रचंड बुध्दिमान होती,पण तिचा स्वभाव कडक होता.चांगले वळण लागावे म्हणून ती खूप मारत असे.जितकी मारत असे तितके छप्पर फाड के प्रेमही करत असे*.


*माझ्या आयुष्यावर तिच्या संस्काराचा फार मोठा प्रभाव आहे.तिनेच मला नाटकाचा पहिला धडा दिला.माझी जोडून जोडून गोष्ट सांगण्याची वेगळी कल्पना तिने हेरली आणि त्याला योग्य खतपाणी घातले.त्याचा फायदा मला असा झाला की मी लहान वयातच दोन तीन पाने रोज सहज लेखन करत असे.वयाच्या आठव्या वर्षी माझे पुस्तक प्रकाशित झाले होते. गणिताचे आणि माझे कधीच जमले नाही पण मला संस्कृत,फ्रेंच,रशियन,इंग्रजी भाषा येत होत्या यात आईने मला शिक्षणात दिलेल्या उत्तम संधीचा मोठा वाटा होता*.


*माझे उच्चार स्पष्ट होते याचा फायदा मला आकाशवाणीत काम करण्यासाठी झाला.येथे नोकरी करताना मी मुलांसाठी नाटके लिहली.पक्ष्यांचे कविसंमेलन हे नाटक असो वा 'सय माझा कलाप्रवास' हे आत्मथन मी लिहले.कला क्षेत्रात इतका मोठा प्रवास करताना आईचे उत्तम संस्कार मला पदोपती आठवतात*.


*आई नावाचे गूढ आपण कितीही उकलण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही.समुद्राच्या खोलीचा अंत नसतो तसाच तिच्या प्रेमाचा अंत नसतो.आई कोणत्याही प्रांतातील असली तरी तिची लेकरावरील माया गाय वासरासारखीच असते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०