गोष्ट माझ्या आईची भाग १९

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝अनुताई वाघ प्रसिद्ध शिक्षणतज्ञ .*            

  📔       *भाग - १९*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईने अतिशय साध्या परिस्थितीत संसार केला.तरीही तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान कधी मावळले नाही.माझा बालविवाह झाला  पण वयाच्या बाराव्या वर्षी माझे पती अपघातात मरण पावले.मला अकाली विधवेचे सोहळे नेसावे लागले.पण आईला हे मान्य नव्हते त्या काळात सगळा विरोध झुगारून तिने मला अकोल्याला शिक्षणासाठी पाठवले.पुढे मी शिक्षिका झाले*.


*ताराबाई मोडक यांच्या कोसबाड येथील आदिवासी शिक्षण केंद्रात काम करू लागले.संस्थेसाठी लोकांकडून देणगी गोळा करताना माझी कसरत होत असे कधी कधी लोक पैसे देत नसे. अशावेळी मला आईचे बोलणे आठवत असे"जेव्हा एखादा प्रश्न एका मार्गाने सुटत नाही तेव्हा मार्ग बदलून पहावा."मी तेच करत गेले आणि अनेक प्रश्न सुटत गेले*


*माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो,त्याने विद्येची आणि प्रयत्नांची कास कधीही सोडू नये. असे आई कायम सांगायची. अनुताई वयाच्या बाराव्या वर्षी विधवा झाल्या तरी आई खंबीर होती म्हणून त्या शिकल्या आणि शिक्षिका झाल्या त्यांच्या आईच्या खंबीरतेचे वेगळेपण येथे अधोरेखित होते*.


*आई नसल्यावर आई लक्षात येते सर्वांच्या.आई मुलाच्या पहिल्या दिवसापासून अगणित चुका पोटात घेते तिला नसतील का वेदना होत ?त्याच्या या चुकांच्या,पण ती सोसत राहते सगळे*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०