गोष्ट माझ्या आईची भाग-७
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝डॉ.संजय ओक .*
📔 *भाग - ७*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव मेघा. आमची परिस्थिती बेताचीच होती.आई पुण्याच्या हायस्कूल मध्ये शिक्षिकेची नोकरी करत होती.आपल्या मुलांवर शब्दाने संस्कार करण्यापेक्षा कृतीने संस्कार करण्यावर तिचा अधिक भर असे.तिच्या शाळेत मला सहज प्रवेश मिळाला असता,पण आपल्या मुलाने मिळवलेले यश निखळ असावे म्हणून तिने मला दुसऱ्या शाळेत घातले*.
*मी पुस्तकी किडा व्हावा,अशी तिची अपेक्षा कधीच नव्हती.तिने मला साहित्य,हिंदी भाषा,इंग्रजी याच्या परीक्षा सतत द्यायला लावल्या.आपला मुलगा अष्टपैलू व्हावा अशी तिची इच्छा होती.जेव्हा मी जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळवून बोर्डात ४९ वा आलो तेव्हा तिने मला सांगितले "हे यश फक्त आणि फक्त तुझ्या मेहनतीचे आहे*
."
*यानंतरची एक आठवण खुप वेदना देते काही कारणाने मेडिकलच्या सीट कमी झाल्या होत्या, मला पहिल्या प्रयत्नात अँडमिशन मिळाले नाही.मी निराश होऊन आत्महत्या करायला निघालो होतो.आईला हे समजले तिने सांगितले धीर सोडू नको तुझे अँडमिशन नक्की होईल.मला मिरजेच्या कॉलेजला सहा महिन्याने प्रवेश मिळाला.आपला लेक घरापासून दूर जाणार म्हणून मी कॉलेजला गेल्यापासून ते तेथून बाहेर पडेपर्यंत ती मला सतत आठ वर्ष रोज एक पोस्ट कार्ड लिहायची,मीही तिला त्याचे उत्तर द्यायचो.हे फक्त आईच करू शकते*.
*माझे मामा ब्लड कॅन्सर ने वारले हे तिने मला पेपर झाल्यावर आठ दिवसांनी सांगितले कारण त्या काळात माझी मेडिकलची परीक्षा सुरू होती.स्वतःची नोकरी,मला रोज पत्र लिहणे,मामाचे दुखणे, कुटुंब हे सारे सांभाळताना ती कधी कंटाळली नाही कारण ती आई होती.*
. *डॉ.संजय ओक इतके प्रसिद्ध डॉक्टर झाले त्यांच्या या यशातून आईला वजाच करता येणार नाही.कारण आई अनुभवाने शिकते कोणती गोष्ट किती वेळ मुरवावी,शिजवावी किंवा साठून ठेवावी.जणू तेच संस्कार ती मुलांवरही करत राहते आयुष्यभर*.
Comments
Post a Comment