गोष्ट माझ्या आईची भाग-१

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝अभिनेत्री रीमा लागू .*            

  📔       *भाग - १*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते मंदाकिनी.ती मराठी रंगभूमीवर कलावंत होती.मी लहान असताना आई मला अनेकदा नाटकाच्या प्रयोगाला आणि तालमीला नेत असे.त्यामुळे रंगभूमी,नाटक दौरे हे मला लहानपणापासून परिचित होते लहानपणी मला व्यवस्थित पणा माहित नव्हता.त्यावरून आई मला रागवत असे. ती अत्यंत शिस्तबद्ध होती.तीच शिस्त तिने मला लावली.मी केवळ अभ्यासू की किडा होऊ नये म्हणून ती मला स्पर्धा,उपक्रम, कला साधना यात  जाणीवपूर्वक सहभागी व्हायला लावायची."तुला आयुष्यात जे करायचे आहे कर,मी नाही म्हणणार नाही ,पण जे करायचे आहे ते आम्हाला सांगून कर आणि मनापासून कर"असे ती कायम सांगायची.*


*जेव्हा हायस्कूल चे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा तिने मला सांगितले तू आता पुण्याच्या हॉस्टेल मध्ये शिक्षण घे.मला सुरुवातीला राग आला,नाराज झाले.आईपासून दूर जायचे म्हटल्यावर दुःख झाले.तेव्हा तिने मला डोळसपणे समजावले मुंबईत राहशील माझ्या बरोबर राहशील तर तुला तुझे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळणार नाही.घर आणि आई म्हणजे सारे जग नाही.बाहेरचे जग मोठे आहे.त्याची तुला खरी ओळख घरापासून दूर गेल्यावर होईल.मी नाईलाजाने गेले त्याचा राग काढायचा म्हणून दोन महिने हॉस्टेल वर खूप खोड्या केल्या.पण पुढे चूक लक्षात आली  मग सर्वांची लाडकी झाले.बेस्ट स्टुडंट्स अवार्ड ही मिळवला.मी लहान असताना मला चित्रपट नाटकात काम करण्याच्या ऑफर येऊ लागल्या.पण आधी शिक्षण मग सारे असा संस्कार तीने माझ्यावर केला.मी अभिनेत्री होणार याचा अंदाज तिला लहानपापासूनच आला असावा.*


*आई मला म्हणायची"अभिनय सहजस्फुर्त आला पाहिजे प्रत्येक भूमिकेचे व्यक्तिमत्व जाणून ती साकारली पाहिजे.तिच्या या संस्कारामुळेच मी 'सविता दामोदर परांजपे या नाटकातील गंभीर भूमिका आणि 'तू तू मैं मैं या मालिकेतील विनोदी भूमिका व' हम आपके है कौन? मधील प्रेमळ आईची भूमिका सारख्याच    हजारो भूमिका कौशल्याने साकारू शकले.माझे हे अफाट यश फक्त आणि फक्त आईच्या संस्काराचे प्रतिक आहे.रीमा लागू आयुष्यात यशस्वी झाल्या त्या आईच्या उत्तम संस्कारामुळे.*


*शेवटी आईच्या मनाच्या तळाशी असते ती मातीतून मोती उगवून आणण्याच्या क्षमतेची ओल आपल्या मुलांना अंकुरण्यासाठी.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०