गोष्ट माझ्या आईची भाग- १२

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर .*            

  📔       *भाग - १२*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव कमला. मी शास्त्रज्ञ झालो यात माझ्यावर माझ्या आईच्या संस्काराचा फार मोठा प्रभाव आहे.कोणत्याही आव्हानाला तोंड देताना ते आव्हान समर्थपणे पेलायची जिद्द ठेवायची,स्वतःचा स्वाभिमान कितीही अडचणी आल्या तरी गहाण टाकायचा नाही.गरज पडली तर त्याची किंमत मोजायची पण तो जपायचा.अशी तिची शिकवण होती*. 


*मी भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून नियुक्त होण्याची परीक्षा दिली ती मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो.यात मला स्ट्रेस ॲनलीसेस हा विषय मिळाला.त्यावेळी प्रचंड खर्च करून एक सिरॅमिक कोटिंग मशीन आयात केले होते.त्याचा वापर कसा करायचा कोणाला माहीत नव्हते.मी ते आव्हान स्वीकारले आणि पूर्ण केले.यामागे आईची प्रेरणा होती की कोणतेही काम हाती घेतले की शेवट पर्यंत प्रयत्न सोडायचे नाही*.


*राजस्थान मधील एक अणुभट्टी बंद पडली,आता कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार असे सर्वांना वाटते,भट्टी भंगारात निघणार असे सर्वांना वाटले.मी त्या भट्टीची पाहणी केली,त्यातून मी अणुभट्टी वाचवली हे मोठे यश माझ्या आईने केलेल्या संस्काराचाच भाग होता*


.*प्रचंड बुध्दिमान असणाऱ्या डॉ.अनिल काकोडकर यांना योग्य ठिकाणी योग्य निर्णय घ्यायला आईची मदत अमूल्य होती*.


*आई काढते रांगोळी चार चौकोनाची सासर,माहेर,नवरा,आणि मुले हेच असतात तिचे चार चौकोन.आणि भरत  राहते ती त्यात रंग आपल्या मनासारखा.पण काळजी घेते कोणताही रंग कधी घरात सांडणार नाही याची.कारण तिला तिचे आईपण जपयाचे असते शेवटपर्यंत*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०