गोष्ट माझ्या आईची भाग-4

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝बाबासाहेब पुरंदरे .*            

  📔       *भाग - 4*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*आई मुद्दाम संस्कार करत नसतेच,ती काळजी घेत असते.पोराच्या मनाची आणि शरिराचीही ती अगदी सहजपणे जपणूक करत असते.मला माझी आई वयाच्या पस्तीसाव्या वयापर्यंत लाभली.मला हेही सांगितले पाहिजे की माझ्या जीवनावर आईपेक्षा वडिलांकडून झालेल्या सहज संस्काराचा  जबरदस्त परिणाम झाला.माझ्या लाडक्या वडिलांच्या बाबतीत मी एकशे एक टक्का कृतज्ञ आहे*

.

*आईचे वागणे पहात पहात मी घडत होतो.अगदी मंद अग्नीवर दूध तापत जाव,मग त्यावर साय यावी,पण पातेल्याला काजळी येऊ नये इतक्या हळुवार आईच्या संस्कारावर माझ्या आयुष्याचे दूध तापत गेले.आईने ते वेळच्यावेळी तापवले, ऊतू जावू दिले नाही,आणि कधी नासूही दिले नाही*.


*आमच्या आई तस पाहिले तर घरातील सर्वांच्याच आई सारख्या होत्या.जरा वेगळे पण होते त्या आम्हाला अहो जावो घालत आणि आम्ही त्यांना.हा आमच्या घराण्याचा जुनाजाणता रिवाजच होता.मुद्दाम कपाळावर आढ्या आणायच्या नाहीत.घरी पाहुणा आला तर चेहऱ्यावर हास्य असावे ही आईची शिकवण होती.मला पाण्यापासून धोका आहे असे भविष्य एका ज्योतिषाने सांगितले यावर विश्वास न ठेवता माझ्या आईने मला पोहायला पाठवले  तिची विचार करण्याची पद्धत ही अशी होती.आम्ही भावंडे आईसाहेबांच्या सहवासात असे सहज घडत गेलो*.


 *बाबासाहेब पुरंदरे थोर इतिहास संशोधक व शिवचरित्रकार झाले यात आईचा वाटा मोठा होता.आई एक आभाळ असते.तिची इतकी ताकद असते की खऱ्या खुऱ्या आभाळालाही आई नावाचे आभाळ हवे असते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०