गोष्ट माझ्या आईची भाग -3

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 रवींद्रनाथ टागोर .*            

  📔       *भाग - 3*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते शारदा देवी.ज्या काळात स्रीयांना स्वयंपाक गृहाच्या बाहेर पडायची मुभा नव्हती,त्या काळात माझी आई शिकली होती.माझ्या आईचा आवाज खुप चांगला होता. ती छान गात असे.मी आयुष्यात अनेक कलांमध्ये निपुण व्हावे अशी तिची इच्छा होती.तिच्या कामाच्या व्यापात आई आमच्या वाट्याला कमी येत असे,पण जेव्हा तिचा सहवास लाभत असे तेव्हा तो स्फूर्तीदायक असे.गाणी आणि गोष्टी ऐकाव्यात तर त्या आईच्याच मुखातून.तिची स्मरणशक्ती उत्तम होती*

.

*जेव्हा भारत देशात ब्रिटिश सत्तेविरूद्ध लढा सुरू होता तेव्हा तिने मला ब्रिटिश शाळेत पाठवण्याऐवजी घरीच शिकवणी दिली होती.तिची महत्वाची शिकवण म्हणजे कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाणे व आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा मुकाबला करणे.मला अजूनही ते दिवस आठवतात.आम्ही खुप वैभवात दिवस काढलेले होते गरिबी अशी माहित नव्हती.पुढे आजोबांचे अचानक निधन झाले. त्यानंतर दिवस पालटले.काही क्षणात श्रीमंतीतून  गरिबीत  झालेला बदल आमच्यासाठी नवा होता.तरी आई याही संकटात डगमगली नाही.या परिस्थतीच्या झळा मुलांना बसू दिल्या नाही*.


*कधी मी छान चित्र काढायचो,कधी सुंदर गाणे गायचो,कधी चिंतन करत बसायचो याचे तिला भारी कौतुक असे.जेव्हा मी पाहिली कविता लिहिली तेव्हा तिला किती आनंद झाला होता. आयुष्यात माझी पत्नी , कन्या,पुत्र यांचा मृत्यू झाला त्याही मोठ्या दुःखातून मी सावरलो ते आईने माझ्यावर केलेल्या संस्कारामुळेच. प्रत्येक वेळी बदलत जाणाऱ्या परिस्थितीपुढे न झुकता ती कायम खंबीरपणाने कुटुंबासाठी ढाल बनून उभी राहिली*.


*रवींद्रनाथ टागोर इतके महान झाले यात आईचा वाटा मोठा होता.तसे तर मुकी पाखरेही आईची येण्याची वाट पहात असतात.येथे तर टागोरांची सुखदुःखेच आईच्या भोवती फिरत होती*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०