गोष्ट माझ्या आईची भाग -१३

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक .*            

  📔       *भाग - १३*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर या गावामध्ये एक संस्कृत पंडिताच्या घरात माझा जन्म झाला.मी खुप मोठा संस्कृत पंडित व्हावे अशी आईची इच्छा होती परंतु माझा ओढा मात्र वेगवेगळया कलांकडे होता.जेव्हा मी जाणता झालो तेव्हा मी स्वप्न पाहून लागलो.आणि असेच जनातेपणी मी एक स्वप्न पाहिले होते की मी भारतीय बनावटीचा चित्रपट बनवणार आणि तो मी बनवला.* 


       *राजा हरिश्चद्र चित्रपट बनवताना माझ्याकडील पैसे अक्षरशः संपून गेले.पण कितीही अडचणी आल्या तरी डगमगून जाऊ नको ही आईची शिकवण धीर द्यायची.तोच संस्कार माझ्यासाठी दीपस्तंभासारखा* *ठरला.मला चित्रपट निर्मितीची* *काहीही माहिती नसताना मी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला जमेल त्या मार्गाने पैसे जमा केले.विदेशात जाऊन समान आणले आणि चित्रपट काढला*


       *ही सारी प्रेरणा जणू आईचीच. माझी आई अगदी साधी होती.पण तिने केलेले संस्कार मोलाचे होते.कोणतेही काम सर्वस्व अर्पण करून पूर्ण करावे.जीवनात कधीही प्रतिकुलतेला घाबरु नये,त्याचा धैर्याने मुकाबला करावा, असे ती सांगत असे.मी आयुष्यात स्वप्न पाहिली,ती स्वप्न जगलो यात आईचा वाटा फार मोठा आहे.*


         *आई जिवंत असेपर्यंत करत राहतेसगळ्यांचेभरवण्यापसून,थोपटण्यापर्यंत, डबा भरण्यापासून,तो रिकामा करण्यापर्यंत पण कधी कधी कुणाचेच लक्ष जात नाही तिच्याकडे ती कितीही थकली,दमली तरीही*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०