गोष्ट माझ्या आईची भाग-१०
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 साहित्यिक केशव मेश्राम .*
📔 *भाग - १०*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव तानाबाई होते.जेव्हा मी अगदी लहान होतो आणि ज्या काळात मला तिच्या सहवासाची गरज होती,प्रेमाची गरज होती तेव्हा ती मला फारशी लाभली नाही.कारण तिला संसार चालवण्यासाठी मिलमधल्या वायडिंग खात्यामध्ये नोकरीसाठी जावे लागत असे.ती अगदी ओळी बाळंतीण असतानाही या चक्रातून सुटली नाही*.
*ती नोकरीला गेल्यावर माझी उपासमार होऊ नये म्हणून. ती स्वतःचे दूध पिळून वाटीमध्ये पिळून भरून ठेवत असे. तिच्या परोक्ष ते दूध आजी मी रडू लागलो की चिमुटभर अफू टाकून कापसाच्या बोळ्याने पाजत असे.मी लवकर झोपावे हे अफू टाकाण्यामागे खरे कारण.मी गुंगी येवून झोपत असे आणि आजीला त्रास होत नसे.आई खवळली की ती खुप मारायची.तिच्या माराला मी खुप घाबरत असे.पण ती प्रेमळही तितकीच होती*.
*आईची शिकवण होती ती अशी एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून स्वस्थ बसू नये,तर इतर ती कशी करतात हे पहावे ती शिकण्याचा प्रयत्न करावा.यात काही चुका झाल्या तर त्या दूर करून पुन्हा प्रयत्न करावा आणि ती गोष्ट आत्मसात करावी,हा मोठा संस्कार माझ्या मनावर त्यातून घडला.आपण कोणतीही गोष्ट करू शकतो हा आत्मविश्वास फक्त आईनेच मला दिला*.
*केशव मेश्राम इतके प्रसिद्ध साहित्यिक झाले ते आईने अतोनात श्रम केले म्हणूनच.आई मुले रुपी रोपट्याना जन्म देते.त्याचे झाड होते अशाही परिस्थितीत ती झाडांना मोठमोठ्या वादळातही उन्मळून देत नाही हेच ते आईचे वेगळेपण*.
Comments
Post a Comment